नाहाटा महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा :

भुसावळ (प्रतिनिधी) – येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पी. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागातर्फे राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा. डॉ. डी. एन. पाटील होते. प्रमुख वक्ते म्हणून राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. आर. एस. नाडेकर तसेच प्रा. भूपेंद्र बानाईत उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. आर. एस. नाडेकर यांनी राष्ट्रीय मतदार दिनाची पार्श्वभूमी स्पष्ट केली. २५ नोव्हेंबर १९५० रोजी राष्ट्रीय निवडणूक आयोगाची स्थापना झाल्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. २५ जानेवारी २०११ पासून राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यास सुरुवात झाली असून, मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती निर्माण करणे हा या दिनाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जात, धर्म, भाषा व प्रदेशभेद न करता निर्भय व निष्पक्ष मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मतदानाची शपथ घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. राजेंद्र नाडेकर यांनी केले.

या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. बी. एच. बऱ्हाटे, उपप्राचार्य प्रा. डॉ. जी. आर. वाणी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. राज्यशास्त्र विभागाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.