म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा :

भुसावळ (प्रतिनिधी) -नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल, भुसावळ येथे २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिन सोहळा अत्यंत उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी ठीक ७.१५ वाजता भुसावळ नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. गायत्री भंगाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीत व ध्वजगीत गायन करून तिरंग्याला मानवंदना देण्यात आली.

या कार्यक्रमास शालेय शिक्षण सभापती राजेंद्र आवटे, नगरसेवक उल्हास पगारे, सिकंदर खान, संजय नहाटा, नगरसेविका सौ. सिमा नरवाडे, कैलास चौधरी, माजी नगरसेवक रवी सपकाळे, शाळेचे मुख्याध्यापक एस. जी. मेढे, सेवा ज्येष्ठ शिक्षिका सरला सावकारे, स्थानिक नागरिक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ध्वजारोहणापूर्वी भारतीय संविधानाचे वाचन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांकडून तंबाखूमुक्त, कॉपीमुक्त व साक्षरतेची शपथ घेण्यात आली. तसेच संगीत कवायतीचे सादरीकरण करण्यात आले.

ध्वज संचालन डॉ. प्रदीप साखरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन एन. एच. राठोड यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी के. डी. चौधरी यांच्याकडून विद्यार्थ्यांना बिस्किटांचे वाटप करण्यात आले. मिठाई वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली.