भुसावळ, दि. २६ (प्रतिनिधी) –
भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७६ वा वर्धापन दिन सोमवार, दि. २६ जानेवारी २०२६ रोजी शासकीय व निमशासकीय, शाळा, महाविद्यालय, विविध राजकीय पक्षकार्यालये , सेवाभावी संस्था यासह भुसावळ नगरपरिषद व भुसावळ प्रशासनाच्या वतीने ध्वजारोहण विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

भुसावळ नगरपरिषद
भुसावळ नगरपरिषदेच्या मुख्य इमारतीत सकाळी ८.१५ वाजता ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून हा कार्यक्रम नगरपरिषदेच्या अध्यक्षा मा. सौ. गायत्री चेतन भंगाळे (गौर) यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. यानंतर सकाळी १०.०० वाजता जुने नगरपरिषद कार्यालय, रेल्वे स्टेशनजवळ येथे अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.या सर्व कार्यक्रमांना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भुसावळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विवेक धांडे यांनी केले आहे.
शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम
तसेच प्रजासत्ताक दिनाचा शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम सकाळी ९.१५ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रांगण (जुने डी. एस. हायस्कूल प्रांगण), भुसावळ येथे होणार आहे. या कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण संपन्न होणार आहे.
या सर्व कार्यक्रमांना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार निता लबडे यांनी केले आहे.


