ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये वसंत पंचमी, सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी ;

भुसावळ (प्रतिनिधी )- ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये वसंत पंचमी तसेच स्वातंत्र्यसैनिक सुभाषचंद्र बोस व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या प्राचार्या निना कटलर यांच्या हस्ते ज्ञानदेवता सरस्वती मातेच्या पूजनाने करण्यात आली.

यानंतर सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शाळेच्या उपप्राचार्या श्रद्धाली घुले, मनप्रीत कौर, हर्षला पाटील, सोनाली मुजूमदार यांच्यासह शिक्षकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

प्राचार्या निना कटलर यांनी विद्यार्थ्यांना वसंत पंचमीचे महत्त्व सांगत ज्ञान, शिस्त व संस्कार यांचे महत्त्व विशद केले. तसेच सुभाषचंद्र बोस यांच्या देशभक्तीची प्रेरणा व बाळासाहेब ठाकरे यांच्या सामाजिक कार्याविषयी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धाली घुले यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राचार्या निना कटलर यांनी मानले. कार्यक्रम उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला.

फोटो कॅप्शन – ताप्ती पब्लिक स्कुल मध्ये वसंत पंचमी निमित्त उपस्थित प्रिंसिपल निना कटलर सोबत हर्षला पाटील,श्रध्दाली घुले,मनप्रित कौर,सोनाली मुजूमदार आदी.