भुसावळ (प्रतिनिधी)-: येथील डॉ. उल्हास पाटील सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शुक्रवारी वसंत पंचमी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शाळेच्या प्राचार्या अनघा पाटील यांच्या हस्ते ज्ञानाची देवता सरस्वती मातेचे विधिवत पूजन करण्यात आले. तसेच थोर स्वातंत्र्यसैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी प्राचार्या अनघा पाटील यांनी विद्यार्थ्यांना वसंत पंचमीचे महत्त्व तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या देशभक्तीपूर्ण कार्याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
कार्यक्रमास शाळेतील शिक्षिका पंकजा कुलकर्णी, पूनम कुंडू, रुची जाधव, स्वप्नाली वैराळ यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूनम कुंडू यांनी केले तर आभारप्रदर्शन रुची जाधव यांनी मानले.
फोटो कॅप्शन – डॉ. उल्हास पाटील स्कुल मध्ये वसंत पंचमी निमित्त द्वीपप्रज्वलन करुण उद्घाटन करतांना प्रिंसीपल अनघा पाटील सोबत पंकजा कुलकर्णी,पूनम कुंडु,रुची जाधव,स्वप्नाली वैराळ आदी.


