चांदवड (प्रतिनिधी)- संक्रांतीचे औचित्य साधून चांदवड येथील श्री संताजी महिला मंडळातर्फे महिलांसाठी हळदी–कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे. पारंपरिक सणांचा उत्साह, आपुलकीचे हास्यविनोद तसेच स्नेहमेळाव्याचा आनंद अनुभवण्यासाठी परिसरातील सर्व महिलांना या समारंभास उपस्थित राहण्याचे सस्नेह आवाहन करण्यात आले आहे.

हा हळदी–कुंकू समारंभ शुक्रवार, दि. 23 जानेवारी 2026 रोजी दुपारी 2 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला असून श्री संताजी महाराज मंगल कार्यालय येथे होणार आहे.
तरी या कार्यक्रमास समाजातील सर्व महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित करावा असे आवाहन अध्यक्ष सौ. गायत्री जाधव उपाध्यक्ष सौ. श्रद्धा जाधव , तर खजिनदार सौ. संगीता पंडित यांनी केले आहे
या समारंभास उपस्थित राहणाऱ्या सर्व महिलांनी जांभळ्या रंगाची साडी परिधान करून उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक समितीकडून करण्यात आले आहे.


