भुसावळ (प्रतिनिधी ) – तालुक्यातील मानपूर येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले. या रस्त्याच्या निर्मितीमुळे मानपूर व परिसरातील नागरिकांना दळणवळणाची सुविधा अधिक सुलभ होणार असून शेतकरी, विद्यार्थी तसेच ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या रस्त्यामुळे शेतीमालाची वाहतूक सुलभ होणार असून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ये-जा करणे अधिक सुरक्षित व सोपे होईल. तसेच आरोग्य, बाजारपेठ व इतर मूलभूत सेवांपर्यंत पोहोचण्यासही मदत होणार आहे.
ग्रामीण विकासाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. नव्या रस्त्यामुळे गावाचा बाह्य संपर्क अधिक मजबूत होईल व मानपूरसह परिसराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.



