धरणगाव(| प्रतिनिधी )
येथील बालाजी मंदिराजवळ राजपूत समाजाच्या वतीने हिंदू कुलभूषण, शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले. सदर पूजन लोकनियुक्त नगराध्यक्षा लिलाताई सुरेश चौधरी यांच्या हस्ते संपन्न झाले.

या प्रसंगी शिवसेना उपनेते तथा रावेर व नंदुरबार जिल्हा संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी महाराणा प्रताप सिंह यांच्या पराक्रम, स्वाभिमान व राष्ट्रनिष्ठेचा गौरव करत उपस्थितांना संबोधित केले.
कार्यक्रमाला राजपूत समाजाचे अध्यक्ष व उद्योगपती जीवन आप्पा बयस, नगरसेवक परमेश्वर महाजन, कडूसिंह बयस, ललित येवले, नूतन सोसायटीचे माजी अध्यक्ष विश्वास बयस, शामसिंग चव्हाण, जगदीश चव्हाण, जितेंद्र बयस, गौरव चव्हाण, मुकेश चव्हाण, यशपाल चंदेल, संकेत चंदेल, गणेश बयस, नितीन चव्हाण, गणेश चौहान, प्रकाश बयस, निलेश बयस, विवेक बयस, सागर बयस, खुशवंत सिकरवार, महेंद्र बयस, दावू राजपूत, कपिल जनकवार, राहुल चव्हाण आदी मान्यवर व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. शेवटी समाजाचे अध्यक्ष जीवन आप्पा बयस यांनी उपस्थितांचे आभार मानले.



