भुसावल (प्रतिनिधी ) –
भुसावल शहर काँग्रेस कमिटी अल्पसंख्यक विभागाच्या शहराध्यक्षपदी अहेमद शेख इब्राहिम कुरैशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्यक विभागाचे जिल्हाध्यक्ष अब्दुल हमीद शेख वाहीद यांनी केली.

या नियुक्तीबद्दल अहेमद शेख इब्राहिम कुरैशी यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष योगेंद्रसिंह पाटील, अल्पसंख्यक प्रदेश उपाध्यक्ष मो. मुनव्वर खान यांच्या हस्ते त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
या प्रसंगी प्रदेश सचिव अॅड. प्रवीण सुरवाडे,माजी युवक अध्यक्ष इस्माईल पहलवान यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी अहेमद कुरैशी यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देत, अल्पसंख्यक समाजाच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे कार्य करतील, असा विश्वास व्यक्त केला.


