भुसावळ जय संताजी महिला मंडळातर्फे सस्नेह हळदी-कुंकू कार्यक्रम :

:भुसावळ ( प्रतिनिधी) — जय संताजी महिला मंडळ, भुसावळ यांच्या वतीने महिलांसाठी पारंपरिक सणाचे औचित्य साधत सस्नेह हळदी-कुंकू समारंभाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम शनिवार, दि. १७ जानेवारी २०२६ रोजी दुपारी २ ते ५ वाजेदरम्यान अहिल्यादेवी कन्या विद्यालय, भुसावळ येथे संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे बक्षिसांची लयलूट व भरगच्च मनोरंजन. महिलांसाठी व मुलींसाठी संगीत खुर्ची स्पर्धा, समूह गीत गायन, नृत्य स्पर्धा व इतर मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले असून, महिलांना आनंद, उत्साह व स्नेहाचा अनुभव घेता येणार आहे.

समाजातील महिलांनी एकत्र येऊन परंपरेचा सन्मान राखत आनंद द्विगुणित करावा, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी समाजातील सर्व महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जय संताजी महिला मंडळाच्या वतीने अध्यक्ष सौ. कविता अशोक चौधरी (माजी नगरसेविका, न. पा. भुसावळ),उपाध्यक्ष सौ. रेखा योगेश धुपे,
सचिव उज्वला बबनराव बागुल (पत्रकार, भुसावळ), सहसचिव सौ. प्रतिभा योगेंद्र चौधरी,कोषाध्यक्ष सौ. भारती संजय चौधरी,
सल्लागार डॉ. सौ. वृषाली चौधरी तसेच समस्त कार्यकारिणी सदस्य यांनी केले आहे . सदर कार्यक्रम महिलांसाठी एक आनंदोत्सव ठरणार असून, सामाजिक एकोपा व सांस्कृतिक परंपरा जपणारा उपक्रम असल्याचे आयोजकांनी सांगितले.