भुसावळ (प्रतिनिधी ) – सक्षम नारी फाउंडेशन, APS फिटनेस झुंबा आणि कमल गणपती हॉल यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी “आरोग्याचे वाण ” या संकल्पनेतून एक आगळा-वेगळा हळदी-कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला आहे. हा विशेष कार्यक्रम सोमवार, दि. १९ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता कमल गणपती हॉल येथे होणार आहे. “निरोगी नारी – सक्षम नारी” या संदेशासह महिलांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. सौभाग्यासोबतच महिलांमध्ये स्वत्वाची आणि आरोग्याची जाणीव निर्माण करणे हा या हळदीकुंकू मागचा मुख्य उद्देश आहे.

या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून सौ. रजनीताई सावकारे (अध्यक्ष, प्रतिष्ठा महिला मंडळ) उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमात महिलांच्या आरोग्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असून त्यामध्ये BMD (हाडांची घनता) तपासणी, Hb (हिमोग्लोबिन) तपासणी तसेच थायरॉईड तपासणीचा समावेश आहे. थायरॉईड तपासणी ही प्रथम येणाऱ्या २० महिलांसाठी उपलब्ध असणार आहे. यासोबतच मनोरंजक खेळ, आकर्षक बक्षिसे आणि आरोग्यविषयक उपयुक्त टिप्स देण्यात येणार आहेत. महिलांची उपस्थिती आयोजकांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल तरी महिलांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


