1000 हून अधिक भुसावळकरांनी घेतला ‘रन भुसावळ’ मध्ये सहभाग; रोटरी रेल सिटीचा भव्य जागरूकता उपक्रम

भुसावळ ( प्रतिनिधी)
रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी व नामदार संजयभाऊ सावकारे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला ‘रन भुसावळ’ हा भव्य जनजागृती उपक्रम आज दि. 11 जानेवारी रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात एकूण 1063 विद्यार्थी, विद्यार्थिनी व नागरिकांनी सहभाग नोंदवला.

कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून ना. संजयभाऊ सावकारे, इव्हेंट अॅम्बेसेडर प्रतीक मणियार (सीए, जळगाव), पोलीस उपअधीक्षक बारबोले, पोलीस निरीक्षक राहुल वाघ, वाहतूक पोलीस निरीक्षक उमेश महाले उपस्थित होते. तसेच ओबिनोल फाउंडेशनचे अश्विन परदेशी, किड्स गुरुकुलचे करण जैन, एस. आर. मार्बलचे सिताराम सैनी, महादेव डिस्ट्रीब्युटर्सचे पंकज कृपालानी, मॉन्जिनीज बेकरीचे अ‍ॅड. तुषार पाटील, एनरझोल एनर्जी ड्रिंकचे संचालक देवेंद्र गिते हे प्रायोजक म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते. साईजीवन सुपरशॉपी व पूजा कन्स्ट्रक्शन यांनीही कार्यक्रमास प्रायोजकत्व दिले.

‘रन भुसावळ’ अंतर्गत 10 किमी, 5 किमी व 3 किमी अशा तीन अंतरांसाठी स्पर्धा घेण्यात आल्या. सर्व धावकांसाठी मार्गावर पाणी, एनर्जी ड्रिंक व प्रथमोपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पारुल वर्मा यांनी झुंबा डान्सच्या माध्यमातून सर्व स्पर्धकांचा वॉर्म-अप घेतला.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी बिसारा रनर ग्रुप, तापी रनर ग्रुप व राधाकृष्ण प्रभात फेरी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. रहदारी नियंत्रणासाठी वाहतूक पोलीस व रोटेरियन बांधवांनी विशेष परिश्रम घेतले. स्पर्धेचे संचालन भुसावळ येथील सर्व क्रीडा शिक्षकांनी समर्थपणे पार पाडले.

सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र, मेडल व पौष्टिक नाश्ता देण्यात आला. तसेच अनुक्रमांक न काढता लकी ड्रॉ पद्धतीने आकर्षक बक्षिसांचे वितरण करण्यात आले. महादेव इलेक्ट्रॉनिक्सचे पंकज कृपालानी यांनी पाच कराओके साउंड सिस्टीम व एक 22 इंची एलईडी टीव्ही प्रायोजित केला होता. लकी ड्रॉमध्ये डॉक्टर पूजा बलके, युवराज सूर्यवंशी, धीरज बारेला, शुभम तिवारी, प्रमिला परिहार यांना साउंड सिस्टीम, तर साई दिलीप सोनवणे यांना 22 इंची एलईडी टीव्ही मिळाला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मकरंद चांदवडकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रोजेक्ट चेअरमन सुयश न्याती, को-चेअरमन चेतन पाटील, अध्यक्ष देवा वाणी, सचिव हरमित सिंग माखन यांच्यासह सर्व रोटेरियन बांधवांनी विशेष मेहनत घेतली.