जळगाव महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेची जाहीर सभा : प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे मार्गदर्शन

जळगाव (प्रतिनिधी ) –
जळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेना उपनेते व शिव व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांची दणदणीत जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.

ही सभा शनिवार, दिनांक १० डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता, छत्रपती शिवाजी महाराज चौक, प्रिप्राळा गाव येथे होणार आहे. या सभेत प्रा. नितीन बानगुडे पाटील हे शिवसेनेची भूमिका, विकासाचे मुद्दे व महापालिका निवडणुकीतील दिशादर्शक विचार मांडणार आहेत.

या जाहीर सभेस जळगाव जिल्ह्यातील शिवसेना, युवासेना, महिला आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवप्रेमी नागरिक व बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.

सदर सभेचे आयोजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, जळगाव जिल्हा यांच्या वतीने करण्यात आले असून गुलाबराव वाघ, शिवसेना उपनेते व संपर्कप्रमुख (नंदुरबार जिल्हा व रावेर लोकसभा) यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे