नॅशनल व्हॉईस मिडिया फोरमकडून पोलिस उपअधीक्षक केदार बारबोले यांचा सत्कार :

भुसावळ प्रतिनिधी:
भुसावळ तालुक्याचे पोलिस उपअधीक्षक केदार बारबोले यांचा नॅशनल व्हॉईस मिडिया फोरमच्या वतीने सत्कार व स्वागत करण्यात आले. यावेळी लेखक जगदीश ओहोळ लिखित “जग बदलविणारा बाप माणूस डॉ. बाबासाहेब आंबेडकर” हे पुस्तक सप्रेम भेट देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

पोलीस स्थापना दिनाच्या निमित्ताने उपअधीक्षक केदार बारबोले, पोलिस निरीक्षक महेश गायकवाड, पोलीस अधिकारी पूजा अंधारे तसेच उपस्थित सर्व पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना नॅशनल व्हॉईस मिडिया फोरमच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

या प्रसंगी नॅशनल व्हॉईस मिडिया फोरमचे प्रकाश सरदार, उत्तर महाराष्ट्र सदस्य राजेश तायडे, जिल्हाध्यक्ष दिनेश इखारे, जिल्हा सचिव रमेश खंडारे, जिल्हा उपाध्यक्ष सुमित निकम, भुसावळ तालुकाध्यक्ष चंद्रशेखर निकम, यावल तालुकाध्यक्ष प्रभाकर तायडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.