भुसावळ येथे विश्वशांतीसाठी सामूहिक जपाचे आयोजन

भुसावळ (प्रतिनिधी) – विश्वशांती, सुख-शांती, समृद्धी, आरोग्य व दीर्घायुष्य सर्वांना लाभावे या उद्देशाने जानेवारी महिन्यात सामूहिक जपाचे आयोजन करण्यात आले आहे. भुसावळ येथे दर रविवारी रात्री साडेआठ ते साडेनऊ या वेळेत पैसठीया यंत्र जप होणार आहे.

दि. ५ जानेवारी रोजी समृद्धी पार्क, मातृभूमी चौकाजवळील अपार्टमेंटमध्ये विजय प्रेमचंद चोरडिया यांच्या निवासस्थानी जप संपन्न होणार आहे.
दि. १२ जानेवारी रोजी कर सल्लागार सार्थक राजेंद्र चोपडा (सीए) यांच्या निवासस्थानी, तर
दि. १९ जानेवारी रोजी सचिन डेलीवाला, सुराणा बिल्डिंगसमोर यांच्या ठिकाणी जप कार्यक्रम होणार आहे.

या सामूहिक जप कार्यक्रमास जास्तीत जास्त श्रावक-श्राविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संघपती जयंतीलाल सुराणा, जे. बी. कोटेचा, राजेश मेहता, कांतीलाल चोरडिया, गौतम चोरडिया, विनोद मेहता, विशाल चोरडिया, अतुल ताथेड व राजेश बाफना यांनी जैन श्री श्रावक संघातर्फे केले आहे