भुसावळ (प्रतिनिधी ) -:
नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 अनुषंगाने आज दिनांक 28 नोव्हेंबर 2025 रोजी मतदान यंत्रांची अंतिम तयारी करण्यात आली. एकूण 20 टेबलांवर ही प्रक्रिया पार पडली असून त्यापैकी 1 टेबल राखीव ठेवण्यात आले होते.

यावेळी मतदानासाठी विविध पदांनुसार मतपत्रिका पेपर तयार ठेवण्यात आले.
अध्यक्ष पदासाठी गुलाबी रंगाची मतपत्रिका
नगरसेवक प्रभाग ‘अ’ साठी पांढरी मतपत्रिका
नगरसेवक प्रभाग ‘ब’ साठी निळी मतपत्रिका
निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक पार पडावी यासाठी सर्व कामकाज संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पूर्ण करण्यात आले. आगामी निवडणुकीसाठी सर्व तयारी पूर्ण होत असल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली आहे.



