कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रावेर व यावल तालुक्यातील प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणी ; अनिल चौधरींचा नैतिक जबाबदारीतुन पुढाकार ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
मदत नव्हे तर कर्तव्य या सामाजिक दायित्वाच्या भावनेतून
आपली नैतिक जबाबदारी ओळखून समाजाप्रती कार्य करणे आवश्यक आहे. या लढाईत योगदान महत्वाचे आहे यां उद्देशाने माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरीं यांनी स्वत: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रावेर यावल तालुक्यातील प्रत्येक भागात, प्रत्येक वार्डात, सर्वसामान्य जनतेच्या घरोंघरी जाऊन शासकीय नियमांचे कातेकोरपणे पालन करून सोशल डिस्टन्स सांभालून लेझर इन्फ्रारेड थरमोमीटर द्वारे आरोग्य तपासणी केली.
कोरोना विषाणूच्या या विळख्यात कोणतीही व्यक्ती अडकु नये यासाठी अनिल चौधरी परिवर्तन मंचाचे सभासद सदैव
प्रयत्नशील आहेत. सर्व सामान्य जनतेची आरोग्य तपासणी व्हावी व जनता सुखरूप राहावी या साठी ते परिश्रम घेत आहे. तसेच
सामाजिक बांधिलकी, माणुसकीचे नाते टिकावे या सेवाभावीवृत्तीने यावल येथील वारीस फाऊंडेशन तर्फे जीवनावश्यक वस्तूंचा संच यावल शहरात वाटप करणारे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य यांच्या घरी जाऊन सर्व कार्यकर्त्यांची सुद्धा लेझर इन्फ्रारेड थरमोमीटर द्वारे आरोग्य तपासणी केली. या वेळी अनिल चौधरीं यांचे सोबत हाकीम हाजी साहब, अतुउल्लाह शेठ, माजी नगराध्यक्ष तुकाराम बारी, अय्युब सर, नगरसेवक दिलीप वाणी, माजी नगरसेवक करीम मण्यार, शकील सर, उमर कच्ची, बसारात सर, नगरसेवक अभिमन्यु चौधरी, रफिक टेलर, आलिम भाई, फारुख शेख, शेर खान, सागर चौधरी आदी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *