धरणगाव (प्रतिनिधी ) – दिवाळी पुर्वी अनुदान नाही
एक वर्ष झाले कर्जमुक्ती नाही, ,
जाहीर करुन फसवलं
आज धरणगावात शेतकऱ्यांचा हंबारडा…!
धरणगांव तालुका महाविकास आघाडीचा वतीने अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्या प्रमाणे दिवाळी पुर्वी अनुदान मिळाले पाहिजे म्हणून जळगाव येथे सागर पार्कवर विधानसभेला मतदान मागण्यांसाठी आले तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक वर्ष पुर्वी जाहीर केल्या प्रमाणे ७/१२ कोरा करुन कर्ज मुक्ती केली पाहिजे, रब्बी हंगामासाठी जाहीर केल्या प्रमाणे १०, ००० अनुदान दिले पाहिजे, अति पावसामुळे वाहून गेलेले घरे,गुरे,ढोरे,पशु,पक्षी प्रत्येकी अनुदान, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांला ५०,०००/ हजार सानुग्रह अनुदान ,पिक विमा मागिल निकषा प्रमाने मिळाला पाहिजे अशा विविध मागण्यासाठी तहसील कार्यालय येथे शेतकरी हबांरडा आंदोलन महाविकास आघाडी व शेतकरी वतीने करण्यात आले.
यावेळी उद्धव बाळासाहेब पक्षाचे गुलाबराव वाघ, जयदीप पाटील, निलेश चौधरी,भागवत चौधरी, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे संजय पाटील, बाळासाहेब पाटील,कल्पिता पाटील, लक्ष्मण पाटील, काँग्रेसचे सम्राट परीहार, रामचंद्र माळी, नंदलाल महाजन या तिन्ही पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




