भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ तालूका विधी सेवा समिती तर्फे दिनांक 25/09/2025 रोजी भुसावळ कारागृहात कायदा महिती शिबिर घेऊन कैद्यांना, प्लीया बार्गेनिंग अधिकार (Plea Bargaining) , कैद्यांचे हक्क (Right of Prisoners) तसेच विधी सेवा समिती बाबत माहिती देण्यात आली.
या शिबिराच्या अध्यक्ष स्थानी भुसावळ कारागृह चे तुरुंगअधिकारी पी. जि . मानकर होते आणि प्रमुख वक्ते तालुका विधी सेवा समिती भुसावळ चे रिटेनर वकील ॲड .अभिजीत मेने होते, तसेच कार्यक्रम चे आयोजन करण्यासाठी विधी समिती चे पिएलव्ही रूपाली नेवे यांनी काम केले
सदरील शिबिर मध्ये ॲड.अभिजीत मेने यांनी कैद्यांना प्लीया बर्गेनिंग, कैद्यांचे हक्क, तालुका विधी सेवा समिती या विषयी माहिती दिली,
तुरुंगअधिकारी श्री पी जि मानकर यांनी देखील मनोगत व्यक्त केले,
तसेच कैद्यांना पिएलव्ही रुपाली नेवे यांनी जिल्हा विधी सेवा प्राधीकरण भुसावळ यांचे माहिती पत्रक वाटले
सदर कार्यक्रम कैद्यांनसाठी राबविण्यात आलेला होता, या वेळी सबजेल भुसावळ मध्ये सोळा(16) कैदी होते , भुसावळ कारागृहात कार्यक्रम घेण्यासाठी परवांगी दिली म्हणुन रुपाली नेवे यांनी आभार मानले.
सदरील कार्यक्रमात जेल पोलीस श्री अरविंद पी पाटील, श्री शिवा चोरमुले श्री संजय पाटील व श्री कोतीलाल पवार उपस्थित होते .



