भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ विभागात विभागीय रेल्वे उपयोगकर्ता सल्लागार समितीची 174 वी बैठक विभागीय कार्यालयात संपन्न झाली. बैठकीच्या प्रारंभी वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक श्री. अजय कुमार यांनी उपस्थित सर्व सदस्यांचे मनःपूर्वक स्वागत केले. या बैठकीत उपस्थित सदस्यांनी आपल्या-आपल्या क्षेत्राशी संबंधित प्रवासी सुविधा वाढविणे, रेल्वेशी संबंधित समस्या लवकरात लवकर सोडविणे यावर सकारात्मक चर्चा केली.

विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री पुनीत अग्रवाल यांनी भुसावळ विभागात सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थित सदस्यांना दिली. त्यांनी मान्यवर सदस्यांना आश्वस्त केले की, प्रवासी सुविधा वाढविणे हे भुसावळ विभागाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. या संदर्भात सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून येत्या काळात या सुविधा प्रत्यक्षात दिसून येतील. सदस्यांनी मांडलेल्या योग्य मागण्यांवर लवकर कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
बैठकीदरम्यान भुसावळ विभागाने मिळविलेल्या यशाबाबत तसेच प्रवासी सुविधांबाबत माहिती देण्यात आली. यावेळी समितीच्या सदस्यांनी आपल्या-आपल्या क्षेत्रातील रेल्वे समस्या, नवीन गाड्या सुरू करणे, गाड्यांचे थांबे वाढविणे, गाड्यांचे विस्तार करणे आणि विभागातील स्थानकांवर प्रवाशांसाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत आपल्या मौल्यवान सूचना दिल्या. विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री पुनीत अग्रवाल यांनी सदस्यांच्या योग्य मागण्यांवर त्वरित कार्यवाहीचे आश्वासन दिले.
या बैठकीस श्री. अनिरुद्ध कुलकर्णी, श्री. श्रीकांत सराफ, श्री. यशवंत जसूद, श्री. राजेश भराड़े (भुसावळ), श्री. मनीष करवा (अमरावती), श्री. अशोक अग्रवाल (मलकापूर), श्री. जितेंद्र देशमुख (चाळीसगाव), कु. माधुरी शर्मा (शेगाव), श्री. राजनारायण मिश्रा, श्री. उन्मेष मालू (अकोला), श्री. पंकज नाटानी (बुरहानपूर)
श्री. संजय सोनवणे (नाशिक) उपस्थित होते.
या प्रसंगी अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (प्रशासन) श्री. सुनील कुमार सुमन, अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (तांत्रिक) श्री. एम. के. मीणा आणि शाखा अधिकारी उपस्थित होते.



