भुसावळ (प्रतिनिधी) –
भुसावळ येथे न्यायालयात फि मागितल्याचा राग आल्याने वकीलास मारहाण झाल्याची घटना १५ सप्टेबर रोजी घडल्याने खळबळ उडाली आहे .
याबाबत शहर पोलीस सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार विवेक केशव आवारे वय ४२ राहणार फेकरी हे वकिली व्यवसाय करतात. सोमवार, १५ सप्टेंबर रोजी दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास आवारे हे कोर्टात काम करीत असतांना धनंजय पंडित पाटील रा .भुसावळ हा तेथे आला. त्याने वकिलांना ना हरकत दाखला मागितला असता. ॲड .आवारे यांनी राहिलेली फि दया मग देता असे सांगितले असता धनंजय यास राग आल्याने त्याने आवारे यांची कॉलर पकडून पोटात बुक्के मारले व शिविगाळ केली व तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली होती .
याप्रकरणी आवारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस स्टेशनमध्ये धनंजय पाटील विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . दरम्यान घटना घडल्यापासून संशयित फरार असल्याचे समजते .



