जळगाव (प्रतिनिधी) : जळगावात जुन्या वादातून हर्षल उर्फ बब्या कुणाल पाटील (18, रा. एकनाथ नगर, रामेश्वर कॉलनी) या तरुणावर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला होता. ही घटना रविवार, 14 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता रामेश्वर कॉलनीतील राज शाळेजवळ घडली होती. याप्रकरणी सोमवारी मध्यरात्री 12.30 वाजता चार जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल होताच चौघांना अक करण्यात आली. अटकेतील तिघे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून एकावर तर यापूर्वी ‘एमपीडीए’ची कारवाई झाली आहे
जळगावात जुन्या वादातून टोळक्याने हर्षल पाटील या तरुणावर रविवार, 14 सप्टेंबर रोजी दुपारी चार4 वाजेच्या सुमारास धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केला. या प्रकरणी जखमीचा मित्र नितीन राजेंद्र देशमुख (21, रा.मंगलपुरी) या तरुणाने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर सोहम गोपाल ठाकरे, दिनेश भरत चौधरी, सनी उर्फ फौजी बाळकृष्ण जाधव, सागर फुलचंद जाधव उर्फ पाव (सर्व रा. रामेश्वर कॉलनी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल होताच त्यांना अटक करण्यात आली.

अटक केलेल्यांपैकी सोहम ठाकरे वगळता अन्य तिघे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यातील सनी जाधवावर या पूर्वी ‘एमपीडीए’चीदेखील कारवाई झाली आहे.


