भुसावळ ( प्रतिनिधी ] –
येथील सेंट अलॉयसिस कॉन्व्हेंट हायस्कूल मध्ये सद्भावना दिवसाचे औचित्य साधुन सर्व धर्म समभावाच्या नावा खाली हिंदु धर्मियांच्या भावना दुखविल्यामुळे शाळा प्रशासन तसेच संबंधित शिक्षकांवर कायदेशिर कारवाई करण्याबाबत भुसावळ शहरात सकल हिंदू समाजातर्फे भव्य मोर्चा काढण्यात आला यावेळी गट शिक्षणाधिकारी व प्रांत अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे .

निवेदनात म्हटले आहे की दिनांक १०/०९/२०२५ रोजी भुसावळ सेंट अलॉयसिस कॉन्व्हेंट हायस्कूल (शाळा) मधील विद्यार्थ्यांना तृतीय सोपान स्काऊट गाईड पुस्तकातील पान १३५ चा संदर्भ देऊन ऐतिहासिक, सामाजिक, धार्मिक किंवा औद्योगिक महत्वाच्या ठिकाणी तुमच्या संघास सहलीसाठी नेवुन त्या ठिकाणचे महत्व समजून घ्या व चर्चा करा या अनुषंगाने शाळेतील मुख्याध्यापक तसेच तेथील संबंधित शिक्षक नामे अमोल दंदावले (सर), इरफान खान (सर), बर्नल (सर), मिस मिशेल यांनी जाणूनबुजून व हेतुपुरस्सर स्थानिक धार्मिक स्थळे भेट देण्यासाठी निवडली व त्याकरिता प्रति विद्यार्थी १०० रुपये शुल्क अवाजवी स्वरुपात घेण्यात आले जेव्हा की सदर शाळेला शासकीय अनुदान मिळत आहे.
विद्यार्थ्यांना सर्व प्रथम चर्च मध्ये नेऊन ख्रिस्ती धर्माबाबत तेथील धर्म गुरुंनी इतंभुत माहिती जसे की प्रार्थना कशी करावी त्यांचे काय फायदे आहे. तसेच या बाबत माहिती देऊन प्रत्यक्षिक करुन दाखवले व ख्रिस्ती धर्म हिंदु धर्मापेक्षा कसा श्रेष्ठ आहे याची सुमार २ तासांपर्यंत माहिती दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांना घेऊन शाळेचे शिक्षक लोक हे भुसावळ येथील सराफ बाजार लक्ष्मी चौकातील जामा मशिदीत घेऊन गेले. सदर मशिदीत प्रवेश करण्या अगोदर विद्यार्थिना स्काऊट गाईडच्या युनिफॉर्म मधील रुमालाला टोपी व हिजाबा प्रमाणे घालण्यासाठी सर्वा विद्यार्थी व विद्यार्थीनींना बंधनकारक केले. व त्यानंतर विद्यार्थी व विद्यार्थिनींना मशिदीमध्ये प्रवेश दिला. तेथे हजर असलेल्या मौलानांनी नमाज पठन कसे करावे, किती वेळ व कसे करावे याबाबत माहिती देऊन प्रत्यक्षिक करुन दाखविले व इस्लाम धर्माचा प्रचार, प्रसार व महत्व पटविण्यासाठी इस्लाम आतंकवाद नव्हे आदर्श या पुस्तकाचे विनामुल्य वाटप केले व सुमारे एक तास विद्यार्थ्यांना मशिदी मध्ये बसवुन इस्लाम धर्माबाबत माहिती दिली व इच्छा नसतांना मशिदीत असलेले खजुर व चहा बिस्कीट तेथे खाण्यास दिले. वास्तविक इस्लाम धर्मा प्रमाणे स्त्रीयांना मशिदी मध्ये प्रवेश वर्जीत असतांना देखिल हिंदु विद्यार्थीनींना मशिदी मध्ये प्रवेश दिला. या मागे मोठे षडयंत्र असल्याचे दाट शक्यता नाकारता येत नाही.
त्यानंतर विद्यार्थ्यांना भुसावळ येथील गुरुद्वारा येथे घेऊन जाण्यात आले. व तिथे त्यांना लंगरचा प्रसाद देऊन शिख धर्माबाबत कोणतीही माहिती न देता १५ ते २० मिनीटात संबंधित शाळेच्या मागे असलेल्या शिव मंदिरात घेऊन जाण्यात आले. तेथे संबंधित शिक्षकांनी ज्या विद्यार्थीना मंदिरात दर्शन घ्यायचे आहे. त्यांनी लवकरात लवकर दर्शन घेऊन प्रांगणात यावे अशी ऐच्छिक अट ठेवली. त्यामुळे इतर धर्मिय विद्यार्थी हे मंदिराच्या प्रांगणात उभे राहिले. सदर ठिकाणी हिंदु धर्माबाबत किंवा शिवलिंगाबाबत कोणतीही माहिती विद्यार्थ्यांना सांगण्यात आली नाही. त्यानंतर संबंधित शिक्षकांनी शाळेत जावयाचे असल्याचे विद्यार्थ्यांना सांगितले असता काही विद्यार्थ्यांनी बौध्द विहार, जैन मंदिर तसेच पारसी या धार्मिक स्थळांवर घेऊन जाण्यास विनंती केली असता संबंधित शिक्षकांनी उडवा उडवीचे उत्तर देऊन घेऊन जाण्यास टाळाटाळ केली.
या सहलीमध्ये अंदाजे ९०% विद्यार्थी हे हिंदु धर्मीय असुन त्यांना जाणीवपुर्वक इतर धर्मियांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. त्यामुळे जाणीवपुर्वक हिंदु धर्मायांच्या भावना दुखवून सामाजा-समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे बेकायदेशिर कृत्य संबंधीत शाळा प्रशासनाने व संबंधित शिक्षकांनी केले आहे. त्यामुळे भुसावळ हे शांत शहर असुन भुसावळ शहराची शांता भंग झाली आहे. म्हणुन सकल हिंदु समाज या घटनेचा तिव्र शब्दात निषेध करून सदरची तक्रार आज रोजी आपणास देत आहोत.
या अगोदर देखील या शाळेने धार्मिक भावना दुखविण्याचे अनेक असुरी कृत्य केलेले आहे. जसे की शाळेमध्ये विद्यार्थ्यांना राखी बांधुन येण्यास मनाई केली जाते. तसेच हिंदु धर्मात पवित्र मानल्या जाणारा कलवा
देखील बांधुन येण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. मुलींना कुंकू अथवा टिकली लावुन तसेच कानातील आभुषण परिधान करुन तसेच हातावर मेहंदी काढून येण्यास प्रतिबंध आहे .
राष्ट्रगीत झाल्यानंतर साँग बुक नावाच्या पुस्तकामधील ख्रिस्ती धर्माचे प्रार्थना करण्यात येते इ. प्रकार खिस्ती धर्माच्या प्रचार प्रसारासाठी बिनधोक पणे सुरु आहे.
वास्तविक सदर शाळेमध्ये ९५% हिंदुधर्मीय असल्याने हिंदु सण मोठ्या उत्साहाने साजरे होणे अपेक्षित असतांना सदर शाळा हि सण-उत्सव साजरे करतांना भेद-भाव करित असते. वास्तविक केंद्र शासनाच्या राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या निर्णयाप्रमाणे सणांबाबत भेदभाव करणे हा अपराध मानण्यात आला आहे. मात्र सदर शाळा शासनाचे नियम धाब्यावर ठेऊन मनमानी कारभार करीत आहे. सदर शाळा प्रशासन व संबंधित शिक्षक यांनी सहलीत गेलेल्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांना धमकवून कोणतीही तक्रार दिल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करण्यात येईल असे सांगितल्याने भिती पोटी संबंधित पालक अथवा विद्यार्थी तक्रार देण्यासाठी समोर येण्यास तयार होत नाही. त्याचाच एक भाग म्हणून दि. १५/०९/२०२५ रोजी शाळा प्रशासनाने सहलीला गेलेल्या काही निवडक विद्यार्थ्यांना ढालीप्रमाणे वापर करून प्रसार माध्यमांना बेकायदेशीररित्या शाळेत बोलावले व शाळा प्रशासनाच्या बाजुने मुलांना मुलाखत देण्यास भाग पाडले. जेव्हा की हे सर्व विद्यार्थी कायदेशीरदृष्ट्या अज्ञान बालक आहेत.
संबंधित शाळा प्रशासन हे वारंवार हिंदु धर्माच्या भावना दुखावीत असल्यामुळे शाळा प्रशासन व संबंधित शिक्षकांवर धार्मिक भावना दुखवल्या बाबत कडक कायदेशिर कारवाई ७ दिवसाच्या आत करण्यात यावी. तसेच सदर शाळेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात यावी व शाळेचे शासकीय अनुदान बंद करण्यात यावे. आपण तसे न केल्यास लोकशाही व कायदेशीर मार्गाने शाळा प्रशासनाविरुध्द मोठे आंदोलन करण्यात येईल व त्याच्या परिणामास व खर्चास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असे निवेदनात म्हटले आहे .


