कासोदा (प्रतिनिधी) – येथील पोलीस स्टेशन हद्दीतील कासोदा गावाला लागून असलेल्या बांभोरी शिवारात गालापुर रोडवर फैजल शेख यांचे शेतात काही इसम जुगाराचा खेळ खेळत असल्याची गोपनिय माहीती सपोनि. निलेश राजपुत यांना मिळाल्या वरून दिनांक ११/०९/२०२५ रोजीपो कॉ अकिल मुजावर, पोकों समाधान तोडे, पोकॉ प्रशांत पगारे, पोकों कुणाल देवरे, पोकॉ योगेश पाटील असे पथक रवाना केले. सदर पथक बातमी प्रमाणे गेले असता गालापुर रोडचे कड़ेला वाहने उभी करुन फैजल शेख यांचे शेताला लागुन असलेल्या नाल्याकाठी काहीइसम जमिनीवर बसुन घोळका करुन पैसे टाकुन पत्त्याचा खेळ खेळतांना दिसले. जुगाराचा खरंगलेला डाव पोलिसांनी ४.३० वाजेच्या सुमारास छापा टाकुन उधळून लावला व त्यांचेवर कारवाई करण्यात आली आहे.

सदर पकडलेल्या इसमामध्ये १) शेख फारुख शेख नबी वय ५० वर्षे, २) शेख शहीद शेख रफिक वय ४० वर्षे, ३) शेख निजाम शेख सिराज वय ५२ वर्षे ४) तस्लीम सुलेमान खान वय ५७ वर्षे ५) शेख हमीद शेख शौकत वय ४३ वर्षे ६) शेख हमीद शेख अमीर वय ४० वर्षे ७) शेख मुस्ताक खान अमीर खान वय ६० वर्षे सर्व रा. कासोदा ता. एरंडोल जि.जळगाव अशांचा समावेश असुन त्यांचे अंगझडतीत व घोळक्यातुन ३३८०/- रुपये रोख, २२०००/- रुपये किमंतीचे मोबाईल व १,४०,०००/- रुपये किमंतीच्या ३ मोटार सायकल असा एकुण १,६६,०३०/- रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन त्यांचेवर पोको १७१८ समाधान तोंडे यांचे फिर्याद वरुन सदर इसमाविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी सर यांच्या आदेशानुसार व अपर पोलीस अधिक्षक श्रीमती कविता नेरकर-पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शन व सुचना प्रमाणे सपोनि निलेश राजपुत, , पो कॉअकिल मुजावर, समाधान तोंडे, प्रशांत पगारे, कुणाल देवरे, योगेश पाटील अशांनी केली आहे.


