. भडगाव ( प्रतिनिधी ) –
सध्या महाराष्ट्र राज्या व जळगाव जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने नागरिकांना थेट दिलासा देण्यासाठी राजस्व अभियान या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ पर्यंत राबवण्यात येणार असल्याचे भडगाव तहसीलदार शितल सोलाट यांनी या अभियानाची माहिती व या अभियानामुळे नागरिकांना मिळणारे फायदे तसेच महसूल विभागाशी संबंधित कामे यासंदर्भात
भडगाव तहसील कार्यालय येथे पत्रकार परिषदेत माहिती देत. या अभियानात
नागरिकांना उद्भवणारे महत्वाच्या अडचणी जसे
थकबाकी मुक्ती मोहीम १३ सप्टेंबर रोजी लोकअदालतीत थकबाकी प्रकरणे निकाली काढली जाणार.
जीवंत ७/१२, मृत व्यक्तींची नावे वगळणे
वारसांची नोंदणी व स्त्रियांचे समसमान हक्क नोंदवणे
सर्व प्रकरणे २ ऑक्टोबरपूर्वी निकाली
जीवंत रेशनकार्ड, मृत व अपात्रांची नावे वगळणे
अपंग, आदिवासी व वंचित घटकांचा समावेश करणे,
शेत सुलभ योजना (तुकडेबंदी कायदा, १९४७)
सर्व प्रकरणांची तपासणी करून ७/१२ अद्ययावत करणे. पाणंद रस्त्यांची नोंद, गावातील पायवाटे/रस्त्यांची नोंदणी, ग्रामसभेत सामाजिक लेखापरीक्षण
दफनभूमी/श्मशानभूमीवरील अतिक्रमण हटवणे.
छत्रपती शिवाजी महाराज महासमाधान शिबिर
प्रत्येक तालुक्यात विशेष शिबिरे आयोजित.
शेतकरी आत्महत्या पीडित कुटुंबे
पेन्शन, आर्थिक सहाय्य व शासन योजनांचा लाभ
महाविद्यालयीन शिबिरे, जात, उत्पन्न, रहिवासी दाखले वितरित,जमीन रूपांतरण (वर्ग २ ते वर्ग १)
सर्व प्रकरणे २ ऑक्टोबरपूर्वी निकाली
सामाजिक आर्थिक सहाय्य योजना
बेघर, अनाथ, झोपडपट्टीतील व वंचित कुटुंबांना मदत

अशा अनेक योजनांचा या राजस्व अभियानात राबविण्यात येणाऱ्या योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आव्हान यावेळी तहसीलदार शितल सोलाट, निवासी नायब तहसीलदार सुधीर सोनवणे, यांनी केले आहे. या सेवा पंधरवड्याचा उद्देश नागरिकांच्या दारापर्यंत शासन सेवा पोहोचवणे आणि थेट दिलासा देणे. हे उद्दिष्ट असून यासाठी नागरिकांना या सेवांचा लाभ अवश्य घ्यावा असे आव्हान करण्यात आले.



