भुसावळ (प्रतिनिधी ) -: येथील जामनेर राेड वरील श्री गजानन महाराज मंदिरात ऋषीपंचमी साजरी करण्यात येणार आहे.
दि. ८ सप्टेंबर १९१० रोजी श्री गजानन महाराजांनी संजीवन समाधी घेतलेली आहे, त्यानुसार यावर्षी ऋषिपंचमीच्या दिवशी २८ ऑगस्ट गुरुवार रोजी गजानन महाराजांचा संजीवनी समाधी सोहळा मंदिरावर अतिशय उत्साहात साजरा करण्यात येणार आहे
तरी या दिवशी आपल्या मंदिरावर सकाळी ५:३० पासून श्री गजानन महाराजांचा अभिषेक… पूजन आदी सर्व कार्यक्रम तसेच अखंड पारायण हाेणार आहे. तसेच या दिवशी सकाळी ९:३० पासून तर रात्री ९:३० पर्यंत पिठलंपोळीचा प्रसाद वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला असून भक्तांनी या विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे.
तरी ज्या गजानन भक्तांना प्रसाददानाच्या कार्यक्रमास काही दान करायचे असल्यास उदा. गहू, चणाडाळ, किराणा सामान, तेल,गॅस हंडी,पोळी, बुंदीचे लाडू इत्यादी साहित्य जामनेर राेडवरील गजानन महाराज मंदिरात सेवेक-यांशी संपर्क साधून सहकार्य करावे ही विनंती.




