महाराष्ट्र हादरले ! तीन विद्यार्थ्यांनी प्रेमसंबंध ठेवण्यास जबरदस्ती केली,अल्पवयीन मुलीची आत्महत्या –

नाशिक –
अल्पवयीन मुलींवर होणारा छळ, ब्लॅकमेलिंग आणि सोशल मीडियाद्वारे होत असलेला मानसिक त्रास यामुळे आत्महत्येच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. प्रेमसंबंधांचा दबाव, बदनामीची भीती आणि सततच्या त्रासाला कंटाळून अनेक मुली टोकाचे पाऊल उचलत आहेत. अशाच एका धक्कादायक घटनेने पुन्हा एकदा समाज हादरून गेला आहे.

नाशिकमध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण राज्य हादरून गेले आहे. एका अल्पवयीन मुलीला एकाच महाविद्यालयात शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांनी प्रेमसंबंध ठेवण्यास जबरदस्ती केली. याच त्रासाला कंटाळून 12 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेदहा वाजता तिने आपल्या घरातील बेडरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी मुलीविरोधात बदनामीकारक पोस्ट Instagram वर टाकली होती. एवढंच नव्हे तर, फोन करून सतत शिवीगाळ व मानसिक त्रास दिला जात होता. या मानसिक छळामुळे ती प्रचंड नैराश्यात गेली होती. अखेरीस तिने टोकाचे पाऊल उचलत आयुष्य संपवल

दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात, एक फरार

या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. मात्र, तिसरा आरोपी फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

समाजात संतापाची लाट

घटनेनंतर नाशिक शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. समाजमाध्यमांवरही आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. एका अल्पवयीन मुलीला सतत मानसिक छळ करून टोकाला नेणाऱ्या या घटनेमुळे पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुढे आला आहे.

ही घटना केवळ नाशिकपुरती मर्यादित नाही, तर मुलींवर होणाऱ्या मानसिक छळाचे भीषण रूप समाजासमोर आणणारी आहे. पोलिसांनी काटेकोर तपास करून दोषींना कठोर शिक्षा मिळावी, अशी सर्व स्तरांतून मागणी होत आहे.