भुसावळात महिला क्रिडा मंडळ आयोजित राज्यस्तरीय खुल्या बुध्दीबळ स्पर्धा संपन्न ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ येथे महिला क्रिडा मंडळ आयोजित राज्यस्तरीय खुल्या बुध्दीबळ स्पर्धा स्थानिक संतोषी माता हॉल येथे दिनांक 24 ऑगस्ट रोजी संपन्न झाल्या . सकाळी 11 वाजता या राज्यस्तरीय स्पर्धा सुरु झाल्या.
स्पर्धेत अकाेला, शहादा, धुळे, नाशिक, अमरावती, जळगाव, चोपडा, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, नाशिक ,ठाणे येथून स्पर्धक सहभागी झाले होते
भुसावळ
येथील महिला क्रिडा मंडळातर्फे आयोजित राज्यस्तरीय बुध्दीबळ स्पर्धेचे उद्घाटन गेल्या वर्षीच्या बुध्दीबळ स्पर्धेतील विजेते डाॅ. उल्हास पाटील मेडीकल हाॅस्पीटलचे डीन डॉ. नारायण आर्वीकर यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यंकटेश स्टिलचे संचालक विकास पाचपांडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी मंगला पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
स्पर्धेत एकुण 8 राउंड घेण्यात आले व प्रत्येक राउंड 40 मिनीटांचा होता अशी माहिती प्रो. चेअरमन जयश्री ओक यांनी दिली. प्रत्येक टेबलवर टायमर क्लाॅकची व्यवस्था केली होती. त्यामुळे अचून रिझल्ट मिळण्यास सहकार्य मिळाले .
प्रत्येक राउंडचा रिझल्ट लगेच वेबसाईटवर आँनलाईन बघता येत होता. तसेच पेपर प्रिंट घेऊन बोर्ड वर बघता येत होता.
आठ राउंड नतर फायनल रिझल्ट काढला गेला
व लगेच बक्षिस समारंभाचे आयोजन होतेभुसावळ मधील अनेक समाजिक, संस्था मंडळेंचे सदस्य, अध्यक्ष, सचिव यांचा सुध्दा सत्कार यावेळी करण्यात आला.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, डी. वाय. एस. पी. संदिप गावीत, रजनी सावकारे, डॉ. नारायण आर्वीकर, डॉ. विकास कोळंबे, अनंत पाटील उपस्थित होते. वस्त्रोद्योग मंत्री श्री.संजय सावकारे यांनी आपल्या भाषणात बुध्दीबळ हा खेळ मुलांना घरातल्या घरात खेळाता येतो. मोबाईल, टिव्ही. साठी एक चांगला पर्याय आहे. महिला क्रिडा मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक करून असे उपक्रम मुलांसाठी आवश्यक असल्याचे सांगितले.
डी.वाय.एस.पी. संदिप गावीत म्हणाले… बुध्दीबळ खेळ अवघड आहे पण हा खेळ बुध्दीला चालना देणारा आहे. एखाद्या समस्येवर विवीध पैलुनी विचार कसा करावा हे बुध्दीबळाचा खेळ शिकवते व आयुष्यात तेच उपयोगाचे असते.
महिला क्रिडा मंडळ अशा प्रकारे स्पर्धा घेउन मुलांच्या विकासासाठी कार्य करीत आहेत
असे सांगितले.
मंडळाच्या अध्यक्षा आरती चौधरी यांनी स्वागत करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला!
या स्पर्धेत ७५ वर्षे वयाचे पदमाकर करंकर सर्वात ज्येष्ठ तर सर्वात लहान ५ वर्षे वयाची उत्कर्षा इंगळे व वेध देव यांनी सहभाग घेतला हाेता. सुत्रसंचलन कावेरी चाैधरी यांनी केले. आभार प्रदर्शन लता होसकोटे यांनी केले. परीक्षक म्हणून भरत आमले व अभिषेक जाधव (पाचाेरा), नथ्थू साेमवंशी, दिपक सावळे (रावेर), दिनेश ठाकरे यांनी काम बघितले. तर महिला क्रिडा मंडळाच्या अध्यक्षा आरती चौधरी, सचिव लता होसकोटे, जयश्री ओक, कावेरी चौधरी मंगला पाटील, अनिता कवडीवाले, लता ढाके,प्रभा पाटील, सुनीता पाचपांडे, मनिषा पाटील, माधुरी गव्हाळे, विनीता नेवे,अनिता सपकाळे, वैशाली अनंत पाटील, चेतना खडसे संगीता पाटील, भारती चव्हाण, यांनी सहकार्य केले
१४ हजाराची राेख बक्षिसे
महिला क्रिडा मंडळतर्फे आयाेजीत केलेल्या बुध्दीबळ स्पर्धेसाठी एकुण २७ बक्षिसे देण्यात आली. यात भुसावळ क्विन, भुसावळ कींग असे दाेन तर १४ हजार रूपयांची राेख स्वरूपात बक्षिसे हाेती. तसेच ट्राॅफी , प्रमाणपत्र असे बक्षिसांचे स्वरूप हाेते. स्पर्धकांसाेबत त्यांचे पालकही माेठ्या संख्येने स्पर्धेत ठीकाणी आले हाेते. ओपन गृपमध्ये पहिले बक्षिस ४ हजार, दुसरे तीन हजार, तिसरे बक्षिस २ हजार, एक हजार आणि उतेजनार्थ 6 जणांना प्रत्येकी ८०० रूपये प्रमाणे राेख बक्षिसे, ट्राँफी व प्रमाणपत्र दिले.

प्रसंगी या महिला क्रिडा मंडळाचा झाला सन्मान ;
प्रतिष्ठा महिला मंडळ, जय गणेश जेष्ठ नागरिक संघ, ताप्ती योगा क्लब, स्वयंपुर्णा महिला मंडळ, गुरुदेव जेष्ठ नागरिक मंडळ, सकल लेवा महिला मंडळ, यांचा सत्कार करण्यात आला.