भुसावळ (प्रतिनिधी ) –

प्रवाशांच्या सोयीसाठी भुसावळ विभागातील खालील स्थानकांवर काही गाड्यांना प्रायोगिक तत्त्वावर थांबे दिले आहेत –
- गाडी क्रमांक 12113/12114 नागपूर – पुणे गरीब रथ एक्सप्रेसला मलकापूर स्थानकावर 2 मिनिटांचा थांबा.
- गाडी क्रमांक 12149/12150 दानापूर – पुणे एक्सप्रेसला रावेर स्थानकावर 2 मिनिटांचा थांबा.
- गाडी क्रमांक 20925/20926 अमरावती – सुरत एक्सप्रेसला बोदवड स्थानकावर 2 मिनिटांचा थांबा. विवरण पुढीलप्रमाणे –
१) नागपूर -पुणे गरीबरथ एक्सप्रेस
गाडी क्रमांक १२११४ नागपूर -पुणे गरीबरथ एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक २४.०८.२०२५ पासून मलकापूर येथे आगमन २३.०४ वाजता आणि प्रस्थान २३.०५ वाजता अतिरिक्त थांबा असेल.
गाडी क्रमांक १२११३ पुणे -नागपूर गरीबरथ एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक २५.०८.२०२५ पासून मलकापूर येथे आगमन ०३.१४ वाजता आणि प्रस्थान ०३.१५ वाजता अतिरिक्त थांबा असेल.
२) दानापूर -पुणे एक्सप्रेस
गाडी क्रमांक १२१५० दानापूर -पुणे एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक २२.०८.२०२५ पासून रावेर येथे आगमन १७.४४ वाजता आणि प्रस्थान १७.४५ वाजता अतिरिक्त थांबा असेल.
गाडी क्रमांक १२१४९ पुणे -दानापूर एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक २३.०८.२०२५ पासून रावेर येथे आगमन ०५.२२ वाजता आणि प्रस्थान ०५.२३ वाजता अतिरिक्त थांबा असेल.
३) अमरावती -सुरत एक्सप्रेस
गाडी क्रमांक २०९२६ अमरावती -सुरत एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक २५.०८.२०२५ पासून बोदवड येथे आगमन १२.०९ वाजता आणि प्रस्थान १२.१० वाजता अतिरिक्त थांबा असेल.
गाडी क्रमांक २०९२५ सुरत -अमरावती एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक २८.०८.२०२५ पासून बोदवड येथे आगमन १८.३७ वाजता आणि प्रस्थान १८.३८ वाजता अतिरिक्त थांबा असेल.
या गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा.
प्रवाशांनी कृपया नोंद घ्यावी आणि सुविधेचा लाभ घ्यावा अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे.


