लाल पाणी कादंबरीतून जनजागृती

भुसावळ (प्रतिनिधी )आपल्या लेखणीतून व्यसनमुक्त होण्यास केलेली जनजागृती नाशिकेत चावदास नेमाडे मु.पो. ओझरखेडा ता. भुसावळ जि. जळगाव यांनी वयाच्या ७६ व्या वर्षी ग्रामीण भागातून मधुर शब्दांची गुंफण करून वेगवेगळे टिप्स देऊन व्यसना ने  ग्रासलेल्या माणसाच्या बुद्धीत प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला असून समाज जीवनात व्यसनाधीनता, त्यातील उद्रेक, संसाराची होणारी राख रांगोळी याचे क्लेशकारक रौद्ररूप याचे वास्तव विविध पात्रांच्या संवादात असून त्यातील विचार भावनांची मनोवेधक आंदोलने, त्यांच्या संवेदना याचे चित्रण लेखकाच्या लालपाणी या समर्पक शीर्षकात असून वाचनीय तथा प्रेरणाइदायी आहे. व्यसनाधीनता विमुख करणारी जिद्द, तळमळ, त्यातील आत्मविश्वास प्रेमभावना जवळ असल्यास रेणूसारख्या पात्राच्या कर्तव्यातून समाज मणाला दिशादर्शक आहे.

लाल पाणी कादंबरी बायकोच नवऱ्याची दारू सोडू शकते व स्वतःवरती अटळ विश्वास ग्रामीण भागातील लहान मुलांपासून ते मोठ्या पर्यंत सर्वच दारूच्या व्यसनाने कमी जास्त प्रमाणात लोक ग्रासलेले आहेत. गल्लीबोळातील दिसणारे वास्तव शहरी भागातील सुशिक्षित कुटुंब सुद्धा व्यसनाने ग्रासलेले यांची मनस्थिती परिस्थिती

पाणी

किती भयानक दृश्य, नवरा बायकोचे विकृत भांडण उध्वस्त झालेला संसार अतीवेशनाने मरण त्यातच एक मुलगी येथे शिकलेली रेणुका तिचे वडील सुद्धा दारूच्या व्यसनाने ग्रासलेले, आई सुशिक्षित तिथूनच मुलींनी सुरुवात केली वडिलांपासून व्यसनमुक्त करण्याची गावोगावी सभा घेऊन लोकांना जीवन किती अनमोल आहे हे प्रेमाने समजून सांगायची कला वाखाण्याजोगी आहे. जीवनात खरं वास्तव यात लेखकाने सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

२० वर्षांपूर्वी शासनाने असेच व्यसनमुक्त जनजागृती ग्रुप तयार करून पथनाट्यरूपाने… गर्दीच्या ठिकाणी व सरकारी कार्यालयात सुद्धा, लोकांना व्यसनापासून मुक्त होण्याचा संदेश देत होते. ही जनजागृती तेव्हा होती त्यावेळेस व्यसनाधीन लोकांची संख्या दुर्मिळ होती. आता तर तो भव्य पसारा झालेला आहे. तो सुद्धा विषर लेखकाने यात मांडला आहे. या बंदबस्त्यात गेलेल्या विषयाला लेखकाने एक प्रकारे संजीवनी दिलेली आहे. माजी आ. दिलीप भाऊ भोळे, दीपक नासिकेत नेमाडे, रोहिदास पाटील, उदयसिंग पाटील, गोपाळ बानाईत सर, नारायण निळे सर, गणपत पाटील, मुकुंदा करांडे, प्रदीप भंगाळे लक्ष्मी अग्रो मलकापुर, किशोर सुर्यवंशी, किशोर बंडे, विनोद थडे, विलास वाणी, अजय पाटील, ज्ञानदेव सरोदे, महेश प्रभाकर नेमाडे,
गोकुळ लक्ष्मण निळ, भानुदास खाचणे,भास्कर गंगाधर डाके,
मुख्याध्यापक तुकाराम सर,
यांनी ही लेखकाचे कौतुक केले आहे. शासनाने याची दखल घेऊन पुन्हा व्यसनमुक्त जनजागृती करावी हीच अपेक्षा !