भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळ येथे विविध स्पर्धा परीक्षेविषयी मार्गदर्शनपर व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले.या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून पी. एम. श्री जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. खंडारे उपस्थित होते.तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. डी. एन. पाटील, उपप्रचार्य प्रा. डॉ. जी. आर. वाणी, करियर समुपदेशन व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे प्रमुख प्रा.डॉ.चंद्रकांत सरोदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि प्रमुख वक्ते प्राचार्य डॉ. आर. आर. खंडारे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना सुरुवातीला विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून नियोजनबद्ध अभ्यास करावा. स्वतःला कमजोर समजू नका. स्पर्धेच्या युगात आपले अस्तित्व काय याचा विचार करा. जीवनात अपयश, दुःख आले तर त्यावर मात करा. सर्वप्रथम मनाची तयारी करावी. वेळेचे नियोजन करावे तसेच परिस्थितीवर मात करावी. आपले आई वडील,गुरु यांची किंमत करणे. डॉ. बाबासाहेबांनी पहिले गुरु पुस्तकांना मानले. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासक्रम लक्षात घेऊन त्यासाठी आवश्यक असणाऱ्या विविध मासिके, वर्तमानपत्राचे वाचन करावे. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण करून त्याचे छंदात रूपांतर केले तर लवकर यशस्वी होता येते. अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे म्हणाले की, कोणतेही शिक्षण कमी नाही. स्वप्न पूर्ण करता आली पाहिजे.विद्यार्थ्यांनी आपले ध्येय साधण्यासाठी स्पर्धा परीक्षेकडे लक्ष केंद्रित करावे व महाविद्यालयाच्या नाव लौकिकात भर टाकावी असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.चंद्रकांत सरोदे यांनी केले.प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. आर. एस. नाडेकर यांनी करून दिला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. दीनानाथ पाठक यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. पी. एच. इंगोले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. गौरी पाटील, प्रा. डॉ. आर एस नाडेकर, प्रा. डॉ. ममताबेन पाटील, प्रा.डॉ.विलास महिरे, प्रा. हर्षल पाटील, प्रा. डॉ. संगीता भिरूड, प्रा.डॉ सचिन कोलते, प्रा.डॉ. सचिन राजपूत, प्रा. डॉ.अजय क्षीरसागर, प्रा. गौतम भालेराव, डॉ. स्वाती महाजन, प्रा. वंदना महाजन व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
फोटो कॅप्शन-“स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी” या विषयावर व्याख्यान देतांना कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्राचार्य डॉ. आर.आर. खंडारे, सोबत प्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे, उपप्राचार्य प्रा. डॉ. जी. आर.


