पत्रकार सामाजिक कार्यकर्ते हर्षल पाटील यांचा वाढदिवस वृक्षारोपणाने साजरा :

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील पत्रकार सामाजिक कार्यकर्ते हर्षल पाटील यांचे वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला . . खंडाळा येथील देशदूचे वार्ताहर हर्षल पाटील यांचे वडील कै.अशोक पाटील राजकीय सामाजिक क्षेत्रात जिल्ह्यात नावाजलेलं नाव. भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समिती, शेतकी संघ आदी विविध क्षेत्रात विविध पदे उपभोगलेले एकनिष्ठअसे होते वडिलांपासून सामाजिक कार्याची प्रेरणा घेतलेले हर्षल पाटील यांनी अनेक वेळा रक्तदानही केले आहे अजूनही करत आहे. एक वर्षापूर्वी त्यांच्या वडिलांचे निधन झाले पर्यावरण जागर प्रतिष्ठान यांच्या संकल्पनेनुसार त्यांच्या अस्थी व रक्षा विसर्जनातून आपल्या शेतामध्ये सुद्धा झाडे लावली व ती जगवली. पर्यावरण प्रेमी हर्षल यांचे वाढदिवसानिमित्त भुसावळ शिवपुर कन्हाळा रोड , राज हॉटेल समोरच्या एरियामध्ये त्यांचे मित्र घुले सर यांच्या आग्रहास्तव त्यांच्या घराजवळ असलेल्या ओपन स्पेस मध्ये पर्यावरण जागर प्रतिष्ठान चे संचालक डॉ. सुरेंद्रसिंग पाटील काशीबाई कोल्हे जळगाव येथील घुले सर तसेच एम एस ई बी चे राणे साहेब यांच्या उपस्थितीत दीर्घकाळ टिकणारे वडाचे झाडाच रोप लावून चिंचेच्या झाडाचे रोप त्यांना देऊन त्याचेही वृक्षरोपण करणार आहे झाडांच्या संगोपनाची संपूर्ण जबाबदारी घुले सरांवर स्वीकारली आहे