भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील झुंजार लेवा समाज मंडळाच्या बी व्ही खाचणे सभागृहामध्ये लेवा पाटीदार महासंघाची भुसावळ तालुकास्तरीय बैठक नुकतीच मान्यवरांच्या उपस्थित पार पडली. सुरुवातीला आलेल्या सर्व मान्यवरांचा शब्दसुमनांनी सत्कार करण्यात आला. त्यानंतर महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाचे अध्यक्ष अरुण बोरोले यांनी मनोगतातून लेवा पाटीदार समाजातील चांगल्या व वाईट गोष्टीवर प्रकाश टाकला

त्यासोबतच महासंघाची भूमिका व मागील 25 वर्षाचा कार्याचा लेखाजोखा युवकांनसमोर मांडत असतांना लग्नठरल्यानंतर वधू-वर आणि त्यांच्या पालकांनी कोणत्या गोष्टीचे पालन करायला पाहिजे यांवर प्रकाश टाकला. लेवा पाटीदार मित्र मंडळ, पिंपळे सौदागर चे अध्यक्ष कृष्णाजी खडसे यांनी विवाहची आचारसंहिता याविषयात हात घालत लेवा समाजासाठी आदर्श विवाहाची आचारसंहिते करिता २७ नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. जळगाव चे माजी नगराध्यक्ष बंडुदादा काळे यांनी त्यांच्या मार्गदर्शनात ‘युवकांनी विधायक व सामाजिक कार्यात सहभाग’ या विषयावर सविस्तर माहिती दिली.
माजी आमदार निळकंठ फालक यांनी लग्नातील वाद्य डी.जे. या संबंधित चांगल्या वाईट गोष्टींचे मार्गदर्शन केले. फैजपूरचे श्री. नरेंद्र नारखेडे यांनी ‘विवाहाची आचारसंहिता अनुपालन समिती’ तयार करण्यास मार्गदर्शन केले. याप्रसंगी महाराष्ट्र लेवापाटीदार महासंघाने घालून दिलेल्या आदर्श आचार संहितची पालन करण्याची शपथ सर्व उपस्थितांना देण्यात आली. “सामाजिक कार्यकर्ता कसा असावा याबद्दल डॉ. प्रमोद महाजन, नाशिक यांनी युवकांची चर्चा घडऊन उत्स्फूर्त मार्गदर्शन केले.

या पदाधिकाऱ्यांची झाली नियुक्ती
त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते तालुका स्तर व गावपातळीवरील पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आपले त्यामध्ये खान्देश विभाग संघटक म्हणुन . विनीत पाटील (हंबर्डिकर) भुसावळ, तालुका प्रमुख महणून . मंगेश पाटील भुसावळ, शहर उत्तर प्रमुख . कैलास पाटील व भुसावळ शहर दक्षिण चे प्रमुख . धिरज बऱ्हाटे व इतर पदाधिकाऱ्यांचे नियुक्ती करण्यात आली. नंतर कार्यक्रमाला लेवा भ्रांतृ मंडळ पुणेचे अध्यक्ष . विकास वारके यांनी कृषी अॅप विषयक मार्गदर्शन केले, महासंघाचे डॉ. मिलिंद पाटील, सौ विभावरीताई इंगळे, ऍड. पुरुषोत्तम नेमाडे, ऍड. बोधराज चौधरी, भालोदचे . हर्षल जावळे यांनी मार्गदर्शन केले. किन्ही चे कांतीभाई येवले, आचेगाव चे अक्षय बेंडाळे यांनी युवकांच्या समस्या मांडल्या. गाव प्रमुख नियुक्ती मध्ये अंजनसोंडे गावप्रमुख नितीन भारंबे बेलव्हाय गावप्रमुख महेश खाचणे दर्यापुर गाव प्रमुख गिरीष पाटील फेकरी गाव प्रमुख अतुल चोपडे गोजरा गाव प्रमुख हर्षल तळेले तपतकठोरा गाव प्रमुख श्री देवेंद्र पाटील साकरी गाव प्रमुख श्री संकेत वारके साकेगाव गाव प्रमुख दिलीप वाघोदे सुनसगाव गाव प्रमुख हर्षल पाटील तळवेल गाव प्रमुख चेतन पाटील वराडसीम गाव प्रमुख पराग भारंबे कंडारी गाव प्रमुख युवराज महाजन निंभोरा बू गाव प्रमुख किरण बोरोले यांची नियुक्ती करण्यात आली.
कार्यक्रमाला तालुकाभरातून जवळपास 173 युवक उपस्थित होते. तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश पाटील सर यांनी केले व आभार विनीत पाटील यांनी मानले.


