नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था व रेड स्वस्तिक सोसायटी जळगाव यांच्यातर्फे सैनिक बांधवांना रक्षाबंधन सणानिमित्त रक्षेचे प्रतिक ‘राख्या’ रवाना ;

जळगाव (प्रतिनिधी ) – अहोरात्र आपल्या देशाच्या रक्षणासाठी सीमेवर लढणाऱ्या सैनिक बांधवांसाठी भावा बहिणीचे नाते प्रेमाचे प्रतीक जपणाऱ्या रक्षाबंधन सणानिमित्त सालाबाद प्रमाणे यंदाही नारी शक्ती बहुउद्देशीय संस्था व रेड स्वस्तिक सोसायटी जळगाव तर्फे उत्साहात साजरा करण्यात आला .

या स्तुत्य उपक्रमाअंतर्गत जम्मू-काश्मीर, लेह-लदाख, अरुणाचल प्रदेश, तवांग, सिक्कीम येथील सीमेवर तैनात जवानांसाठी भावपूर्ण राख्या पाठविण्यात आल्या. भावा-बहिणीच्या नात्याचा सण अशा सैनिकांसोबत साजरा व्हावा, यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव येथे या राख्या सुपूर्द करण्यात आल्या

याप्रसंगी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ निलेश प्रकाश पाटील, ऑ सुभेदार मेजर श्री संजय रामराव गायकवाड यांना या राख्या पाठवण्यासाठी सोपविण्यात आल्या या प्रसंगी भावना व्यक्त करताना सुभेदार संजय गायकवाड भावुक झाले सांश्रृ नयनांनी त्यांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.ही सुंदर संकल्पना नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थांच्या अध्यक्ष सौ मनिषा पाटील यांना सुचली आणि सतत गेल्या ५ वर्षापासून सैनिक बांधवांना राख्या पाठविल्या जात आहे.

याप्रसंगी मेजर (डॉ) निलेश प्रकाश पाटील (नि.) जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगाव,
ऑ सुभेदार मेजर श्री. संजय रामराव गायकवाड (नि.) सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगाव, सौ मनिषा पाटील, वंदना मंडावरे, आशा मौर्य, किमया पाटील, कांचन पाटील, हर्षा गुजराती, शिल्पा बयास, श्रावणी पाटील ,शोभना मकवाना.
उपस्थित होत्या.