भुसावळ (प्रतिनिधी ) – रेल्वे सुरक्षा बल (RPF) यांनी एकाच दिवशी ‘ऑपरेशन प्रवासी सुरक्षा’ आणि ‘ऑपरेशन अमानत’ अंतर्गत पाच वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये कारवाई करीत उल्लेखनीय यश मिळवले आहे , प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि हरवलेल्या मालमत्तेच्या पुनर्प्राप्तीसाठी स्तुत्य कामगिरी केली आहे.

या सर्व कारवाई निरीक्षक पी. आर. मीणा यांच्या मार्गदर्शनाखाली आरपीएफ च्या सिपीडीएस टीम आणि सीआयबी स्टाफ यांनी पार पाडल्या. यामध्ये

. मोबाईल चोर अटकेत – ₹11,000 किंमतीचा फोन जप्त: भुसावळ स्थानक दक्षिण बाजू बुकिंग क्षेत्र नजिक
दिनांक: 15.07.2025 रोजी : सकाळी 08 वाजे च्या सुमारास गस्तदरम्यान संशयास्पद स्थितीत फिरत असलेल्या संशयित आरोपी शेख समीर शेख शाहिद (वय 20, रा. गोसिया नगर, भुसावळ) याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याच्याजवळ ₹11,000 किंमतीचा Realme Narzo कंपनीचा मोबाईल सापडला. त्याने 11 जुलै रोजी एका प्रवाशाचा मोबाईल चोरी केल्याचे कबूल केले. याप्रकरणी रेल्वे पोलीस भुसावळ येथे CR 312/2025, U/s 303(2) BNS अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
संशयास्पद प्रवासी जीआरपी कडे सोपवला
दुसऱ्या प्रकरणात: दक्षिण बाजू बुकिंग क्षेत्र, भुसावळ स्थानक येथे
दिनांक: 15.07.2025 सकाळी 10 वाजे दरम्यान संशयित आरोपी रंजीत नरोत्तम रावत (वय 30, रा. बागबई, ग्वालियर, म.प्र.) याला स्थानकात संशयास्पद हालचाली करताना ताब्यात घेण्यात आले. विचारपूस दरम्यान तो समाधानकारक माहिती देऊ शकला नाही. त्याला रेल्वे पोलिसांच्या ताब्यातदेण्यात आले. याप्रकरणी आरोपी विरुद्ध रेल्वे पोलिसांत CR 26/2025, BNS 128 अंतर्गत गुन्हा नोंदवण्या आला आहे .

‘ऑपरेशन अमानत’ – हरवलेली बॅग प्रवाशाला केली परत ;
प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर एक काळ्या रंगाची बॅग ऑन ड्युटी स्टाफ देवेंद्र दीक्षित यांनी 10 ते 15 जुलै 2025 दरम्यान आरपीएफ पोस्टवर जमा केली होती. तपास दरम्यान 15 जुलै रोजी हेमंत संजू बावरे (वय 24, रा. बुरहानपूर, म.प्र.) यांनी बॅगची ओळख पटवली.
बॅगेत ₹5,000 रोख, एक पॉवर बँक व महत्वाचे कागदपत्रे (एकूण किंमत ₹7,000) आढळली. योग्य ओळख व कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर बॅग प्रवासी संजू बावरे यांना सुपूर्द करण्यात आली.

. गोवा एक्सप्रेस मधील 93,000 ची चोरी उघड – आरोपी अटकेत 12779 गोवा एक्सप्रेसमधून दिनांक: 14.07.2025 | रोजी दुपारी 12:50 वाजे दरम्यान एका प्रवाशाची DELL लॅपटॉप, चार्जर, ₹3,000 रोख, ड्रायव्हिंग लायसन्स आणि ATM कार्डसह एकूण ₹93,000 ची मालमत्ता चोरीला गेली होती.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सौरभ कुमार (वय 22, रा. चित्रकूट, उत्तरप्रदेश) याला खंडवा स्थानकावर गाडीमधून पकडण्यात आले. त्याने चोरी केल्याचे कबूल केले .आरपीएफ टीमने त्याला भुसावळ येथे परत आणून रेल्वे पोलिसांकडे सुपूर्द केले. याप्रकरणी CR 321/2025, U/s 305(C) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऑपरेशन अमानत’ मध्ये प्रवाश्याचा सापडलेला मोबाईल दिला –/
भुसावळ रेल्वे स्थानकावर लगेज मशीन, बीट A/1, येथे
दिनांक: 15.07.2025 रोजी : संध्याकाळी 4 वाजे दरम्यान ऑन ड्युटी MSF स्टाफ रफीक शेख यांना लगेज तपासणी करतांना Vivo कंपनीचा ₹15,000 किंमतीचा मोबाईल सापडला.
तपासणीत सदर मोबाईल आकाश प्रीतम सिंह (वय 25, रा. जबलपूर, म.प्र.) या प्रवाश्याने मोबाईलची ओळख पटवून, कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर मोबाईल परत करण्यात आला.
निरीक्षक पी.आर. मीणा यांच्या नेतृत्वाखाली भुसावळ आरपीएफ ची प्रशंसनीय तत्परता
वरील सर्व कारवायांमध्ये निरीक्षक पी. आर. मीणा, सपोनि दीपक कावळे, हे कॉ महेंद्र कुशवाहा, , हे कॉ इम्रान खान, CT देवेंद्र दीक्षित, ASI शिवानंद गीते, CT विनोद रावल, , हे कॉ एस.एस. पवार आणि MSF स्टाफ रफीक शेख यांनी आपली भूमिका अत्यंत उत्कृष्टरीत्या पार पाडली.
या सर्व कारवाया रेल्वे सुरक्षा दलाची कार्यक्षमता आणि प्रवाशांप्रतीची जबाबदारी दर्शवतात. एकाच दिवशी पाच प्रकरणांमध्ये यश मिळवणे ही सुरक्षा व्यवस्थेवरचा जनतेचा विश्वास अधिक बळकट करणारी बाब ठरली आहे .


