महादेव मंदिरातील चोरीचा गुन्हा भडगाव पोलिसांकडून उघड, मुद्देमालासह दोघे ताब्यात ;


भडगांव – कजगाव शिवारातील महादेव मंदिरात झालेला चोरीचा गुन्हा भडगाव पोलिसांनी उघडकीस आणला असून दोघांच्या मुस्क्या आवळल्या आहे. गुन्हयातील 31 हजार रुपये रोख व ऍम्प्लिफायर पोलिसांनी हस्तगत केले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास भडगाव पोलीस करत आहे.
आफिक मेहकर, मिथुन सिंग बावरी असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांनी आणखी कुठे चोरी केली आहे का? याचा तपास भडगाव पोलीस करत आहे.
सदरची कारवाई भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे, सहाय्यक फौजदार छबुलाल नागरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर सोनवणे, निलेश ब्राह्मणकर, पोलीस कॉन्स्टेबल सुनील राजपूत, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण परदेशी, पोलीस कॉन्स्टेबल संभाजी पाटील आदींच्या पथकाने केली आहे.