छत्रपती संभाजीनगर : चेक पॉईंटवर बसला प्रवेश देण्यासाठी दोन हजारांची लाच मागून पंटरांच्या माध्यमातून पाचशे रुपयांची लाच घेताना पेठ चेक पॉईंटवरील मोटार वाहन निरीक्षकांसह दोन खाजगी पंटरांना एसीबीने अटक केली. मोटार वाहन निरीक्षक नितीन भिकनराव अहिरे (49, नेमणूक पेठ चेक पॉइंट) व खाजगी पंटर विनोद अर्जुन साळवे (47) व मनोहर सुनील निकम (27) अशी अटकेतील लाचखोरांची नावे आहेत.29 वर्षीय तक्रारदार हे सामाजिक कार्यकर्ता असून लोकांसाठी सहलीचे आयोजन करीत असतात. 20 मार्च रोजी ते साईबाबा ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसने ते छत्रपती संभाजीनगर, नाशिक येथून अंकलेश्वर गुजरात येथे जात असताना पेठ चेक पॉइंट येथे मोटार वाहन निरीक्षक व खाजगी पंटरांनी परराज्यात प्रवेश करण्यासाठी तडजोड रकमेचे चलनासाठी दोन हजारांची लाच मागणी करून तडजोडी अंती पाचशे रुपये स्वीकारले.
पोलीस उपअधीक्षक दिलीप साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक- वाल्मीक कोरे, हवालदार जीवडे, राजेंद्र जोशी, पोलीस अंमलदार विलास चव्हाण आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.



