उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील रुपल राणा हिने 2024 UPSC नागरी सेवा परीक्षेत 26 वा क्रमांक मिळवत इतिहास रचला आहे. तिच्या जिद्दीने आणि मेहनतीने सिद्ध केले की अडचणींवर मात करत मोठे यश मिळवता येते. रुपलची प्रेरणादायी कहाणी UPSC तसेच इतर क्षेत्रातील स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी मार्गदर्शक ठरते.

शिक्षण आणि प्रारंभिक यश
रुपलचे शिक्षण बागपतच्या जेपी पब्लिक स्कूलमध्ये झाले, जिथे तिने हायस्कूलमध्ये 10 CGPA मिळवले. पुढे, तिने बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स, पिलानी येथे अकरावी-बारावी पूर्ण केली. त्यानंतर दिल्ली विद्यापीठाच्या देशबंधू कॉलेजमधून B.Sc. पदवी घेतली आणि विद्यापीठात टॉपर ठरली.
कौटुंबिक संघर्ष आणि जिद्दीचा विजय
रुपलच्या जीवनात एक कठीण प्रसंग आला –. तिला आईचे छत्र गमवावे लागले. तिचे वडील जसवीर राणा दिल्ली पोलिसांमध्ये असिस्टंट सब-इन्स्पेक्टर (ASI) आहेत. आईच्या निधनानंतरही वडिलांनी तिला मानसिक आणि भावनिक आधार दिला. भावंडांनीही तिच्या प्रवासात खंबीर साथ दिली.
UPSC परीक्षेतील संघर्ष आणि अखेरचे यश
रुपलने पहिल्या दोन प्रयत्नांत अपयश पत्करले, पण तिने हार मानली नाही. चुकांमधून शिकत राहिली आणि तिसऱ्या प्रयत्नात अखेर यश मिळवले. तिच्या कठोर परिश्रमांमुळे आणि दृढनिश्चयामुळे तिने UPSC परीक्षेत 26 वी रँक मिळवून IAS अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले.
रुपल राणाचे यश लाखो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. कठोर परिश्रम, कौटुंबिक पाठिंबा आणि योग्य मार्गदर्शन यांच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते, हे तिने सिद्ध केले. तिची कहाणी UPSCच्या तयारीत असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी नवी उमेद आणि आशा निर्माण करणारी आहे.


