भुसावळात महिला पर्यावरण मंच तर्फे जागतिक चिमणी दिनानिमित्त पक्षांसाठी दानापाण्याची व्यवस्था….


भुसावळ (प्रतिनिधी ) – महिला पर्यावरण मंच सख्या दर महिन्याला काही ना काही वेगळ्या आणि पर्यावरण पूरक ऍक्टिव्हिटी करत असतात.20 मार्च जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून शांतिनाथ नगर मधील शांतीनेश्वर मंदिर परिसरात चिमण्यांसाठी 25 मडकी झाडांना टांगून पाण्याची व्यवस्था तसेच प्लास्टिकचे डबे वापरून दाना(ज्वारी,बाजरी ,मुगडाळ तांदूळ )म्हणजेच खाऊची व्यवस्था पक्षांसाठी करण्यात आली. मंडळाचा सलग चौथा वर्षाचा हा उपक्रम आहे .

भुसावळच्या तप्त उन्हाळ्यामध्ये माणसांच्या जीवाची लाही लाही होते तिथे पशुपक्षी तर मरूनच जातात. चिमण्यांची संख्या तर खूपच कमी होत आहे म्हणून महिला पर्यावरण मंच तर्फे हा एक छोटासा प्रयत्न… असे छोटे छोटे प्रयत्न भुसावळ मधील सर्व नागरिकांनी आपापल्या परिसरामध्ये, मंदिराच्या आवारात, शाळेमध्ये दाना पाण्याची व्यवस्था करावी असे अध्यक्ष शालिनी वाढेकर
यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे.

यावेळी मंडळाच्या कार्यकारिणी सख्या शीतल अरोरा, मंजू सुरळकर, भारती फडणीस, सोनाली राणे त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.. तसेच शांतिनाथ नगर मधील सरोज सपकाळे, लिपिका राऊत, जयश्री इंगळे, नीलिमा समंदर अशा टोटल 15 संख्यांनी कार्यक्रमासाठी मेहनत घेतली. 30 पर्यावरण सख्या उपस्थित होत्या…