आझाद चौकात भीषण आगीत १७ दुकाने जळून खाक –


छत्रपती संभाजीनगर : फर्निचर मार्केटमधील एका दुकानाला लागलेल्या आगीची झळ नजीकच्या दुकानांना बसल्यानंतर तब्बल 17 दुकाने आगीच्या वणव्यात जळाली. ही घटना छत्रपती संभाजीनगरमधील आझाद चौकात घडली. आगीत सुमारे 60 लाखांहून अधिकचे नुकसान झाले आहे.

गुरुवारी पहाटेच्या सुमारास 15 ते 17 फर्निचरच्या दुकानात आग लागली आहे. यामध्ये दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. आगीचे नेमके कारण अस्पष्ट आहे.