भडगावात मेनरोडवरील सराफ दुकानाची भिंत फोडून सहा किलो चांदी व रोख रक्कम चोरून पोबारा ;

भडगाव –
भडगाव शहरातील मेन रोड वरील घोडके सराफ या ज्वेलरीच्या दुकानाची मागील भिंत तोडून अज्ञात चोरट्यांनी सहा किलो चांदी व रोख रक्कम चोरून नेल्याची घटना मंगळवार रोजी सकाळी उघडकीस आली आहे याबाबत भडगावातील मेन रोडवर व भर चौकातील दुकान चोरट्यांनी फोडल्याने पोलीस निरीक्षकांचा धाक संपला की काय असा सवाल नागरिकांकडून करण्यात येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, की मेन रोडवरील घोडके सराफ हे दुकान मालक बाहेर गावी गेल्याने दोन दिवसांपासून बंद होते. या दुकानाची मागची भिंत अज्ञात चोरट्यांनी तोडून दुकानाच्या मध्ये प्रवेश करत चोरी केली. ही घटना आज सकाळी उघडकीस आली….
या प्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे….
शहराच्या मध्यवर्ती भागातच धाडसी चोरी घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून गिरणा नदी पात्रातून सुरू असलेला वाळू उपसा, वाढती चोरी आणि पोलिसांची निष्क्रियता यामुळे कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता भडगाव पोलिसांसमोर चोरांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान आहे.
या घटनेने शहरातील व्यापारी आणि नागरिक अस्वस्थ झाले असून पोलिस प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे….
मडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार घटनास्थळावर भेट यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे