सोनसाखळी चोरट्याला भुसावळातून अटक – अमरावती क्राईम ब्रँचची कामगिरी ….

भुसावळ – शहरातील बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील पापा नगर भागातील संशयित आरोपी आयु ऊर्फे हसन अली नियाज अली विरुद्ध अमरावती पोलीस स्टेशनला १२ गुन्हे दाखल आहेत.गुन्ह्यातील संशयित आरोपी हा भुसावळ शहरात वावरत असल्याची गोपनीय माहिती अमरावती क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब अवचार यांना मिळाली. तात्काळ पथकास भुसावळला रवाना केले.पथक व बाजारपेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होताच त्यांच्यावर हल्ला चढविण्यात आला यात बाजारपेठ ठाण्याचे दोन कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत.मात्र सोनसाखळी चोरट्याला ता.१४ फेब्रुवारी रोजी भुसावळातून अटक केली.

दरम्यान चोरीच्या मोटरसायकल घेवून सोनसाखळी चोरट्यांची टोळी दिवसभरात अमरावती शहरांची पाहणी करीत असत व सायंकाळी पायी फिरणारे महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी फिल्मइस्टेलने मोटरसायकल वर येवून ओढून पसार होत.यासंदर्भात अमरावती शहरातील गाडगे नगर पोलीस ठाणे,राजपेठ पोलीस ठाणे तसेच फैजरपूर पोलीस ठाणे हद्दीत (१५९ ग्रॅम ) अंदाजे १२ लाख रुपये किंमतीचे सोनसाखळी चोरीचे गुन्हे जून २०२४ ते फेब्रुवारी २०२५ दरम्यान १२ गुन्हे पाच संशयित आरोपी विरुद्ध दाखल आहेत. यातील शेख जुबेर राहणार लालखडी अमरावती तसेच आयु ऊर्फे हसन अली नियाज अली या दोघे संशयितांना अमरावती क्राईम ब्रँचने ता..१४ फेब्रुवारी रोजी अटक असून अमरावती मा.न्यायालयात हजर केले असता १९ पर्यत पोलीस कोठडी सुनावली.

सदरील गुन्ह्यातील संशयित आरोपी आयु ऊर्फे हसन अली नियाज अली यांची कसून चौकशी केली असता चोरी केलेला माल भुसावळ शहरातील सराफ व्यापाऱ्यांला विक्री केल्याची कबुली दिल्याने अमरावती क्राईम ब्रँच पथक ता.१७ रोजी संशयित आरोपी आयु ऊर्फे हसन अली नियाज अली यास सोबत घेवून भुसावळात दाखल झाले.आरोपिकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सराफ बाजारातील एक सराफ व्यापारी सह एका कर्मचाऱ्यास ताब्यात घेण्यात आले. सदरील पथकांच्या माध्यमातून चोरीचे सोने खरेदी करणारे दोघे संशयितांची बाजारपेठ ठाण्यात कसून चौकशी सुरू आहे.या गुन्ह्यातील दोन संशयित आरोपीना अटक करण्यात आली असून तीन संशयित आरोपी फरारी आहेत.पथक फरारी आरोपींचा शोध घेत आहेत.

पोलीस ठाण्यात सराफ व्यापाऱ्यांची गर्दी…

भुसावळ शहरातील एका सराफ व्यापाऱ्यांला तसेच काम करणारे कर्मचाऱ्यास अमरावती क्राईम ब्रँच पथकाने ताब्यात घेतल्याने सराफ असोसिएशनचे अध्यक्ष वसंत विसपुते सह सराफ व्यापाऱ्यांनी पोलीस स्टेशन गाठले.आमचे व्यापाऱ्यांनी कुठलेही चोरीचे सोने खरेदी केलेले नाही या गुन्ह्याशी त्यांचा काहीही सबंध नाही अशी एकच रट धरून होते.

पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचक संपला ….

भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील पापा नगर भागात सोनसाखळी चोरीतील गुन्हेगारास पकडण्यात गेलेल्या कर्मचाऱ्यांवर चक्क हल्ला करण्यात आला ही एक खंत ची बाब आहे एक प्रकारे पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचक संपल्याचे हे उदाहरण आहे.

सदरील कामगिरी पोलीस निरीक्षक बाबाराव अवचार, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश इंगोले,पो उप निरी.संजय वानखेडे,पोलीस कर्मचारी दीपक सुंदरकर, गजानन ढेवले, मनोज ठोसर, संग्राम भोजनी, मंगेश शिंदे, योगेश पवार, राजिक रायली वाले, चेतन शर्मा, संदीप खंडारे अशांनी मिळून केली.