भुसावळ : येथिल जामनेर रोडवरील श्री गजानन महाराज देवस्थान तर्फे दि.२० रोजी श्री संत गजानन महाराज यांच्या १४७ व्या प्रगट दिनानिमित्त दि.१७ राेजी पालखी काढण्यात येणार आहे.

पालखीचे आयाेजन
श्री गजानन महाराजांच्या प्रगटदिनानिमित्त
दि.१७ राेजी संध्याकाळी ४ वाजता अष्टभुजा देवी मंदिरापासून ”गण गण गणात बाेते” च्या गजरात पालखी साेहळ्यास प्रारंभ हाेत गांधी चाैक, मरीमाता मंदिर, नाहाटा काॅलेज तद्नंतर गजानन महाराज मंदिर देवस्थान जामनेर रोड येथे सांगता हाेईल.
प्रगटदिनानिमित्त पारायण
प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही दि.२० राेजी प्रगटदिनानिमित्त प्रारंभी श्रींचे स्नान अभिषेक पूजा स.५:३०. ते ७:३०, सामूहिक श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायणास स.६ वाजेपासून सुरूवात हाेणार आहे. तसेच महाप्रसाद वाटप स. ९ ते रात्री १० वाजेपर्यंत करण्यात येणार असल्याने गजानन भक्तांनी लाभ घ्यावा. तसेच ज्या भाविकांना महाप्रसादासाठी काही साहित्य अथवा देणगी द्यावयाची असेल त्यांनी जामनेर रोड वरील गजानन महाराज मंदिरात विश्वस्तांशी दि.२० पर्यंत संपर्क साधावा,असे आवाहन केले आहे.
भुसावळ : जामनेर राेडवरील गजानन महाराज देवस्थान परीसरात महाराजांच्या प्रगटदिनानिमित्त टाकण्यात आलेला आकर्षक मंडप.



