महाकुंभ-२०२५ साठी विनाव्यत्यय आणि सुखकर प्रवासासाठी मध्य रेल्वेने केली विशेष व्यवस्था

भुसावळ – महाकुंभ-२०२५ साठी प्रयागराज येथे जाणाऱ्या भाविकांना विनाव्यत्यय आणि सुखकर प्रवास अनुभव मिळावा यासाठी मध्य रेल्वेने विशेष रेल्वे सेवा, अतिरिक्त प्रवाशी सुविधा आणि गर्दी व्यवस्थापन धोरणांसह सर्वसमावेशक व्यवस्था अंमलात आणल्या आहेत.

विशेष रेल्वे सेवा

प्रवाशांच्या वाढत्या संख्येला सामोरे जाण्यासाठी, मध्य रेल्वेने महाकुंभ-२०२५ साठी ४२ विशेष रेल्वे गाड्यांचे नियोजन केले आहे.

यामध्ये :

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – मऊ – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष गाड्यांच्या १४ सेवा
  • पुणे – मऊ – पुणे विशेष गाड्यांच्या १२ सेवा
  • नागपूर – दानापूर – नागपूर विशेष गाड्यांच्या १२ सेवा
  • लोकमान्य टिळक टर्मिनस – बनारस – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाड्यांच्या ४ सेवा

याव्यतिरिक्त, इतर रेल्वे झोन द्वारे चालवल्या जाणाऱ्या अधिकच्या विशेष गाड्या मध्य रेल्वेच्या स्थानकांवरून जातील, ज्यामुळे यात्रेकरूंना आणखी सुविधा उपलब्ध होईल.

मध्य रेल्वेने खालील स्थानकांवर प्रवासी सुविधा आणि गर्दी व्यवस्थापनाच्या उपाययोजना वाढवल्या:

मुंबई विभाग – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण
पुणे विभाग – पुणे, दौंड, अहमदनगर, मिरज, कोल्हापूर,
भुसावळ विभाग – भुसावळ, मनमाड, नाशिक रोड, खंडवा
नागपूर विभाग – नागपूर, बल्लारशाह, चंद्रपूर, सेवाग्राम, बैतुल, पांढुर्णा
सोलापूर विभाग – सोलापूर

स्थानकांवर उपाययोजना

  • प्रवाशांना मदत करण्यासाठी ‘मे आय हेल्प यू’ केंद्र.
  • अतिरिक्त तिकीट खिडक्या.
  • प्रतिक्षित प्रवाशांसाठी प्रमुख स्थानकांवर जमाव क्षेत्रे ( होल्डिंग एरीया)
  • गर्दी टाळण्यासाठी सरकते जिने आणि उद्वाहकांमध्ये नियंत्रित प्रवेश.
  • प्रवाशांची गर्दी नियोजन करण्यासाठी दुभाजकांच्या मदतीने पादचारी पुलावर एक दिशा मार्गांची अंमलबजावणी
  • सीसीटीव्ही देखरेख आणि घोषणांद्वारे नियोजित वेळेचे व्यवस्थापन.
  • प्लॅटफॉर्मवर एकत्रितपणे गर्दी असलेल्या गाड्या येऊ नयेत यासाठी ट्रेन्सचे धोरणात्मक नियोजन.
  • सर्व प्रमुख स्थानकांवर अतिरिक्त रेल्वे सुरक्षा दल तसेच तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांसह रांग व्यवस्थापन प्रणाली लागू केली आहे जेणेकरून प्रवाशांना सुरळीतपणे चढ उतार करणे सोयीचे होईल.
  • आपत्कालीन परिस्थितीत प्रतिसाद शिष्टाचाराचे उपाय*:
  • जर एखादी ट्रेन आपत्कालीन साखळीने (एसीपी) किंवा इतर कारणांमुळे थांबली तर, प्रवाशांना माहिती देण्यासाठी, चुकीची माहिती रोखण्यासाठी आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ट्रेन कर्मचारी ताबडतोब खाली उतरतील.
  • जवळील स्थानके आणि आपत्कालीन नियंत्रण केंद्रांना इतर जाणाऱ्या गाड्यांचे नियमन करण्यासाठी सतर्क केले जाईल.
  • प्रवाशांना मदत आणि मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख ठिकाणी रेल्वे सुरक्षा दलाच्या तसेच तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांची तात्काळ उपस्थिती.

तसेच नियुक्त केलेल्या प्रतिक्षा क्षेत्रांमध्ये पिण्याचे पाणी आणि शौचालय सुविधा प्रदान केल्या आहेत.

अतिरिक्त उपाययोजना – मुंबई विभाग

  • मुंबई विभागात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दररोज ३ गाड्या तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस येथून प्रयागराजला १२ गाड्या चालविण्यात येत आहेत, तसेच दादरहून (०१०२५ आणि ०१०२७) २ विशेष गाड्या चालविल्या जात आहेत.
  • तसेच कुंभमेळ्यासाठी दोन विशेष गाड्या (०१०३३ व ०१०३१) कार्यरत आहेत.
  • प्रयागराजला जाणाऱ्या दोन्ही विशेष गाड्यांमध्ये (०१०२५ व ०१०२७) प्रत्येकी एक अतिरिक्त डब्बा वाढवण्यात आला आहे.
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे आणि कल्याण येथे पाच अतिरिक्त यूटीएस तिकीट प्रणाली सेवा उपलब्ध केल्या आहेत.
  • गर्दी निरीक्षण करण्यासाठी प्रमुख ठिकाणी वाणिज्यिक अधिकारी (३) आणि ववाणिज्यिक निरीक्षक (१८) तैनात आहेत.
  • रांगेचे व्यवस्थापन आणि सुरक्षेसाठी प्रयागराजला जाणाऱ्या गाड्यांमध्ये १५० तिकीट तपासणी (टीसी) कर्मचारी व ४५ रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी तैनात आहेत.
  • प्रवाशांना तत्काळ (रियल टाइम)ची माहिती देण्यासाठी उद्घोषणांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
    • सर्व मेल/एक्सप्रेस थांब्यावरील स्थानकांवर अन्न आणि पिण्याच्या पाण्याची पुरेशी उपलब्धता करण्यात आलेली आहे.
  • अतिरिक्त उपाययोजना – नागपूर विभाग
  • सध्या नागपूर विभागातून प्रयागराजकडे ३९ गाड्या चालविल्या जात आहेत: २ दैनिक गाड्या (१२७९१ व १२२९५) आणि ३७ साप्ताहिक/पाच दिवसीय ३७ गाड्या, अशा सरासरी दररोज ६ गाड्या.
  • आतापर्यंत पाच विशेष गाड्या चालवण्यात आल्या असून २३ फेब्रुवारी रोजी एक अतिरिक्त ट्रेन नियोजित‌ केलेली आहे.
  • वाढत्या मागणीमुळे यूटीएस तिकिट विक्रीचे बारकाईने निरीक्षण केले जात आहे: १४ फेब्रुवारी रोजी २४५ तिकिटे विकली गेली आणि १५ फेब्रुवारी रोजी ३६० तिकिटे विकली गेली.
  • चढ-उतार करण्यासाठी प्रमुख स्थानकांमध्ये बल्लारशाह (बीपीक्यू) व नागपूर (एनजीपी) यांचा समावेश आहे.
  • रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांसह बल्लारशाह येथे ५ आणि नागपूर येथे १० तिकीट तपासणी कर्मचारी सेवेसाठी असून या कर्मचाऱ्यांना आरक्षित प्रवाशांना मदत करण्यासाठी आणि आरक्षित डब्यांमध्ये अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी तैनात केले आहेत.
  • प्रवासी व्यवस्थापनावर लक्ष ठेवण्यासाठी वाणिज्यिक अधिकारी सत्रांमध्ये तैनात आहेत.
  • ट्रेन येण्यापूर्वी १५ मिनिटे आधी डब्ब्याचे स्थान घोषणा व प्रदर्शित केल्या जात आहेत. • गाड्या येण्यापूर्वी ३० मिनिटे आधीपासून उद्घोषणा प्रणालीवर सतत घोषणा.
  • प्रवाशांचा वावर सुरळीत करण्यासाठी पादचारी पुलावर (FOB) वर तिकीट तपासणी कर्मचारी तैनात.
  • नियोजित वेळेचे निरीक्षण करण्यासाठी प्लॅटफॉर्म भागात सीसीटीव्ही देखरेख.
  • उत्तरेकडे जाणाऱ्या गाड्यांसाठी प्लॅटफॉर्म बदल टाळण्याचे निर्देश परीचालन विभागाला देण्यात आले आहेत.

अतिरिक्त उपाययोजना – पुणे विभाग

  • पुणे विभागामार्फत सध्या प्रयागराजसाठी ७ गाड्या चालविण्यात येत आहेत.
  • ट्रेन क्रमांक १२१४९ पुणे ते दानापूर, आठवड्यातून ५ फेऱ्या (दररोज सरासरी १)
  • तसेच, पुणे विभागाने प्रयागराजसाठी ६ फेऱ्यांसह एक विशेष ट्रेन चालवली आहे (ट्रेन क्रमांक ०१४५५ पुणे ते मऊ जं ११०% प्रवासी क्षमता असलेली)
  • जाणाऱ्या गाड्या: २ गाड्या
  • पुण्यातील यूटीएस तिकिट विक्रीवर लक्ष ठेवले जात आहे.
  • १४/०२/२०२५ रोजी पुणे विभागात स्थानकांपासून महाकुंभ येथे जाण्यासाठी एकूण ९३२ जणांनी तिकिटे खरेदी केली.
  • १५/०२/२०२५ रोजी पुणे विभागात स्थानकांपासून महाकुंभ येथे जाण्यासाठी एकूण ६५४ जणांनी तिकिटे खरेदी केली.
  • पुणे विभागातील प्रयागराज गाड्यांमध्ये प्रवासी चढत/उतरत असलेली महत्त्वाची स्थानके आहेत: पुणे, दौंड, अहमदनगर, मिरज आणि कोल्हापूर
  • १० स्थानक कर्मचारी तसेच विशेष पथके रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांसह प्लॅटफॉर्मवर गाड्या नियोजनासाठी तसेच अनधिकृत प्रवाशांना उतरवण्यासाठी तैनात आहेत.
  • वाणिज्यिक अधिकारी विशेषतः प्रवासी प्रस्थान होईपर्यंत उपस्थित आहेत.
  • डब्ब्यांची स्थिती मागील स्थानकावरून निश्चित केली जात असून आगाऊ प्रदर्शित करण्यात येत आहे.
  • उद्घोषणा प्रणालीवर सतत घोषणा, ट्रेन स्थानकावर येण्यापूर्वी किमान ३० मिनिटे आधी सुरू होत आहेत.
  • पादचारी पुलावर तिकीट तपासणी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत आणि गर्दी सुरळीत राहण्यासाठी तसेच स्टेशनवर गर्दी वाढू नये यासाठी तत्पर करण्यात आले आहेत. • सीसीटीव्ही कंट्रोल रूमद्वारे रेल्वे सुरक्षा दलाकडून वावर क्षेत्रांचे निरीक्षण. गर्दी कमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांना माहिती.
  • फलाटांमध्ये कोणताही बदल होऊ नये म्हणून परीचालन विभागास विशेष निर्देश. विशेषतः मूळ गाड्या आणि उत्तरेकडून येणाऱ्या/जाणाऱ्या गाड्यांसाठी.
  • प्रवाशांना मदत करण्यासाठी पुणे स्थानकावर मदत कक्ष सुविधा तैनात करण्यात आली आहे
  • विशेषतः द्वितीय श्रेणीच्या अनारक्षित आणि स्लीपर डब्ब्यांजवळ रेल्वे सुरक्षा दलाच्या २/३ जणांच्या टीमची प्लॅटफॉर्मच्या दोन्ही टोकांवर उपस्थिती.
  • अशा गाड्या प्लॅटफॉर्मवर येताना/प्रस्थान करताना विभागीय निरीक्षक नियमित उपस्थित.
  • अनधिकृत खानपान होणार नाही याची खात्री करण्यासाठी खानपान व्यवस्थापनाचे नियोजन असून यामुळे प्लॅटफॉर्मवर गर्दीत घट.

प्रवाशांना सुरळीत चढण्यासाठी आणि विना व्यत्यय सुखकर प्रवासासाठी स्थानकांवर आगाऊ पोहोचण्याची विनंती करण्यात येत आहे

विशेष रेल्वे सेवांबद्दल तपशीलवार माहितीसाठी, प्रवासी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट देऊ शकतात किंवा NTES अॅप डाउनलोड करू शकतात.