भुसावळात अडकलेल्या २३ बिहारी मंजूरांसाठी रतनसिंग राजपूत बनले देवदूत ; बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या विनंतीवरून राजपूत परिवारातर्फे मदत ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
लॉकडाऊनमध्ये भुसावळात अडकून पडलेल्या बिहारच्या कामगारांसाठी बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी कॉल करून विनंती केल्यावरून या मजूरांना येथील राजपूत परिवारातर्फे मदत करण्यात आली आहे .
भुसावळात कामानिमित्त आलेले २३ बिहारी कामगार लॉकडाऊनमुळे शहरात अडकले आहेत. परतीचा कोणताही मार्ग नसल्यामुळे ते सध्या जामनेर रोड वरील साईबाबा मंदिर परिसरात राहत आहेत. दरम्यान त्यांनी मदतीसाठी बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना विनंती केली होती. यादव यांनी या संदर्भात पुणे येथील रतन बाहेती यांना फोन केला. बाहेती यांनी भुसावळ येथील त्यांचे मित्र रतनसिंग राजपूत यांना मदतीचे आवाहन केले. यानुसार रतनसिंग राजपूत यांचे पुत्र पुष्पेंद्र सिंग आणि राजेंद्रसिंग यांनी या कामगारांना बासमती तांदूळ, गहू, कांदा-बटाटे व भाजीपाल्यासह किराणा व जीवनावश्यक वस्तुचां पुरवठा करून देत फार मोठा आधार दिल्याने भुसावळात अडकलेल्या २३ बिहारी मंजूरांनी रतनसिंग राजपूत आमच्यासाठी देवदूता सारखे धाऊन आल्याचे म्हणून
कौतुक करीत आभार मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *