भुसावळ (प्रतिनिधी )-
कोविड १९ या विषारी वायुचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता देशभरात लॉक डाउन सुरु आहे . या मुळे शहरातील घरे , हॉटेल , मेस , आदीसह सर्वत्र बंद आहे . यामुळे या दीन दुबळया व गोरगरीब व निराधार गरजु नागरिकांना दोन वेळचे जेवण मिळणे मुश्किल झाले आहे . यांच्यासाठी भुसावळ तालुका शिवसेनेना महिला आघाडीच्या तालुका प्रमुख सौ भुराताई चव्हाण व शिवसेना शहर प्रमुख बबलू ब-हाटे यांच्यावतीने शहरातील निराधार व गोरगरीब यांना खिचडी वाटप करण्यात आली .
सोमवार ३० मार्च रोजी भुराताई यांनी स्वत: जेवण (खिचडी ) बनवून शहरातील बाजारपेठ पोलिस स्टेशन परिसर, बस स्थानक परिसर , डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा रोड वर , तसेच नाहाटा कॉलेज चौफुली जवळील परिसर आदी भागात जावून खिचडी (जेवण) वाटप करण्यात आले . यावेळी भुराताई चव्हाण व बबलू ब-हाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुष्पा खरे, भारती गोसावी ,
हिराताई पाटील ,अनिता पवार , बबलू बऱ्हाटे, वैभव कुळकर्णी, परमेश्वर चव्हाण ,शुभम कुळकर्णी, किसन पाटील, विक्की चव्हाण,यांचेसह शिवसैनिक यांनी सहकार्य केले .



