महाराष्ट्राचे राज्यपालांच्या हस्ते मध्य रेल्वे भुसावळ विभागात नवीन सिंथेटिक ट्रॅक आणि ‘हॉस्पिटल ऑन व्हील्स’ चे उद्घाटन संपन्न ; कर्मचाऱ्यांसाठी क्रीडा आणि आरोग्य सेवेला चालना मिळणार ;

भुसावळ (प्रतिनिधी – महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी. राधाकृष्णन यांनी दिनांक ०८.०१.२०२५ रोजी मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील रेल्वे क्रीडा मैदानावर नव्याने विकसित केलेल्या सिंथेटिक ट्रॅकचे उद्घाटन केले. ही अत्याधुनिक सुविधा रेल्वे ऍथलीट्स आणि रेल्वे शाळेतील मुलांसाठी उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सज्ज असून क्रीडा विकासाला चालना देण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा आहे.

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सिंथेटिक ट्रॅकच्या उद्घाटनानंतर, मैदाना भोवती असलेल्या सिंथेटिक ट्रॅकवर रेल्वे शाळेतील बाल खेळाडूंनी आणलेल्या ‘मशाल’ने ‘ज्योती’ प्रज्वलित केली, जे क्रीडा विकासाच्या उज्ज्वल भविष्याचे प्रतीक आहे.
यावेळी राज्यपालांच्या हस्ते रेल्वे कीमेन या थीमवरील कॉफी टेबल बुकचे प्रकाशनही करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान, रेल्वेच्या कामकाजाची सुरक्षा आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ट्रॅक देखभाल कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्याकडून पुरस्कार विजेत्यांची यादी:
सुनील शांताराम, कीमॅन, एसएसई /पर्मनंट वे, बुरहानपूर दक्षिण;
अनिल कुमार, कीमन, एसएसई/पर्मनंट वे, बोदवड;
छबीनाथ फौजदार, किमॅन, एसएसई/पर्मनंट वे, चाळीसगाव उत्तर

मान्यवरांनी त्यांच्या समर्पणाचे व योगदानाचे कौतुक केले.

या कार्यक्रमाला ना संजय सावकारे, वस्त्रोद्योग मंत्री, महाराष्ट्र शासन
धर्म वीर मीना, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे
श्री श्याम सुंदर गुप्ता, प्रधान मुख्य परीचालन व्यवस्थापक, मध्य रेल्वे,
श्रीमती इति पांडे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक आणि वरिष्ठ रेल्वे अधिकारी यासह अनेक विशेष अतिथी उपस्थित होते. तसेच क्रीडाप्रेमी, रेल्वे कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांसह उपस्थितांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले, जे भारतीय रेल्वेसाठी क्रीडा आणि आरोग्य सेवा क्षेत्रातील महत्त्वपूर्ण प्रगती दर्शविते.

फुटबॉल, हॉकी, व्हॉलीबॉल, भालाफेक, डिस्कस थ्रो, हॅमर थ्रो, लांब उडी, तिहेरी उडी, शॉट पुट आणि पोल व्हॉल्ट यासह अनेक खेळ सिंथेटिक ट्रॅकवर खेळले जाऊ शकतात. या ट्रॅकचा प्राथमिक उद्देश क्रीडा क्षेत्राला चालना देणे, भारतीय रेल्वेची समृद्ध क्रीडा परंपरा मजबूत करणे आणि खेळाडूंची कामगिरी वाढवणे हा आहे. कार्यक्रमादरम्यान नमूद केल्याप्रमाणे, हा ट्रॅक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी उच्चस्तरीय तयारी देखील करेल.

याशिवाय, कार्यक्रमापूर्वी, माननीय राज्यपालांनी सध्या भुसावळ स्थानकावर स्थापन केलेल्या ‘हॉस्पिटल ऑन व्हील्स’चे उद्घाटन केले, या उपक्रमाचा उद्देश रेल्वे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना सोयीस्कर, तत्पर आणि उच्च दर्जाची आरोग्यसेवा प्रदान करणे हा आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी सर्वसमावेशक आणि सुलभ आरोग्यसेवा सुनिश्चित करण्यासाठी मोबाईल हॉस्पिटलची रचना दुर्गम भागात, गॅंग हट सह सेवा देण्यासाठी केली गेली आहे. हे लवकर निदानासह जीवनशैलीतील आजारांची तपासणी आणि वेळेवर उपचार यावर लक्ष केंद्रित करेल, जे कर्मचारी कल्याणासाठी रेल्वे प्रशासनाची वचनबद्धता दर्शवते.