जिल्हा परिषद कर्मचारी अधिकारी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे थाटात उद्घाटन.

भुसावळ-भुसावळ पंचायत समिती भुसावळ द्वारे आयोजित भुसावळ तालुकास्तरीय जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे बियाणी मिलिटरी स्कूल च्या मैदानावरती महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री नामदार संजयजी सावकारे यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले.
सदर प्रसंगी बियाणी एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष , सामाजिक कार्यकर्ते मनोज बियाणी, पंचायत समिती शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे पंचायत समितीचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी सचिन पाठक डायटच्या आधी व्याख्याता शैलेश पाटील प्राचार्य डी. एम. पाटील. महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे अध्यक्ष डॉ.प्रदिप साखरे. क्रीडा भारतीचे बी एन पाटील, राजू कुलकर्णी, भुसावळ तालुका क्रीडा शिक्षक महासंघाचे ज्ञानदेव धांडे विलास पाटील यांच्यासह तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक व सहभागी अधिकारी कर्मचारी शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाची प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे यांनी केले. उद्घाटन पर अध्यक्ष भाषण करताना नामदार संजय सावकारे यांनी क्रीडा स्पर्धा हा माझा आवडीचा भाग आहे भुसावळच्याक्रीडा क्षेत्राला आधीचे वैभव प्राप्त करून देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला जात आहे. विद्यार्थ्यांपासून तर अधिकारी कर्मचारी सुद्धा क्रीडा स्पर्धेत सहभागी होत आहे त्याबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले. व खेळामुळे आपला आत्मविश्वास वाढतो व शारीरिक सुदृढता सुद्धा वाढते त्यासाठी खेळ अवश्य खेळले पाहिजे. असे सांगितले स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले व विजयाच्या शुभेच्छा दिल्या व जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये सुद्धा भुसावळ तालुक्याचे नांव उज्वल करावे अशा शुभेच्छा दिल्या.नंतर नामदार संजय सावकारे यांनी क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन बॉल टोलवून केले.

तसेच महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने नामदार संजय सावकारे यांचा शाॅल, श्रीफळ, पुष्प हार, बुके व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला, तसेच प्राथमिक शिक्षक संघटनेकडून सुद्धा समाधान जाधव व सर्व शिक्षकांनी सत्कार केला. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे क्रिकेट विजय संघ जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक कर्णधार (समाधान जाधव) उपविजेता संघ ग्रामसेवक व अधिकारी संघ, बुद्धिबळ-महिला- प्रथम सारिका दुधंबे, द्वितीय मनीषा घुले, बुद्धिबळ पुरुष- प्रथम रवींद्र पठार, द्वितीय- विजय देवरे, कॅरम-पुरुष-प्रथम समाधान जाधव, द्वितीय-संतोष तायडे , तृतीय-कपिल सुरवाडे, महिला- मनीषा घुले, धावणे-संतोष तायडे प्रथम, समाधान जाधव द्वितीय, महिला मीरा न्यानेश्वर पाटील प्रथम सारिका दूधंबे द्वितीय, गीत गायन स्पर्धा प्रमोद गांधेले प्रथम, अजय चालसे द्वितीय, समाधान जाधव तृतीय, बॅडमिंटन पुरुष-रवींद्र पठारे प्रथम, कपिल सुरवाडे, सूर्यकांत घुले तृतीय, महिला गीता राखीव प्रथम, मीना दुपारे द्वितीय, मनीषा घुले तृतीय,
स्पर्धा आयोजन प्रमुख डॉ.प्रदीप साखरे यांच्या मार्गदर्शनाने पंच म्हणून बी एन पाटील, एम के वाणी, विलास पाटील, हिम्मत पाटील, विजय संकेत, अझर अली, डी आर धांडे, नरेंद्र मस्के, निलेश नेहते, मनोज कुलकर्णी , दिनकर हेलोडे, वाणी सर, यांनी काम पाहिले सूत्रसंचालन विलास पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिन पाठक यांनी मानले. स्पर्धा यशस्वीतेसाठी पंचायत समितीचे व बी.आर.सी.चे सर्वाधिकारी व कर्मचारी बियाणी स्कूलचे सर्व कर्मचारी क्रीडा शिक्षक संघटनेचे सर्व पदाधिकारी व क्रीडा शिक्षकांनी प्रयत्न केले


