-उपवर मुला मुलींच्या पालकांनी 15 जानेवारीपर्यंत परिचय पत्रक भरून देण्याचे माळी महासंघाचे आवाहन

भुसावळ – महाराष्ट्र माळी समाज महासंघ जळगाव जिल्हा यांच्या वतीने समाजातील उपवर मुला-मुलींचा वधू- वर परिचय मेळाव्याचे दिनांक 25 जानेवारी जळगाव येथे आयोजन करण्यात आले आहे. उपवर मुला मुलींच्या पालकांनी येत्या 15 जानेवारीपर्यंत परिचय पत्रके भरून देण्याचे करावे, असे आवाहन महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.
रावेर विभागातील माळी समाजातील उपवर मुला मुलींच्या पालकांनी दिनकर देवमन माळी, भोजराज केशव माळी, संजय छगन पाटील (साकळी) संतोष सुरेश महाजन ( यावल ) प्रशांत पाटील, विनोद उर्खडू पाटील (रावेर), कैलास वेडू माळी, दिनेश नारायण माळी, दिलीप अर्जुन माळी (बोदवड), विजय मधुकर माळी (भुसावळ) संतोष बळीराम माळी, सुभाष काशिनाथ माळी, प्रल्हाद सिताराम माळी (वरणगाव), रुपेश प्रल्हाद महाजन, दिपक वसंत मगरे (चोपडा) हनुमंत झगा महाजन (आडावद), राजू माळी, भागवत बोंबटकर ( मुक्ताईनगर) नरेश लक्ष्मण महाजन, सुरेश पाडूरंग महाजन ( जामनेर) यांच्याकडे वधू वर परिचय पत्रके उपलब्ध असून ते पासपोर्ट फोटी देऊन भरून द्यावे.
जळगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केट जवळील सरदार वल्लभभाई पटेल मंगल कार्यालयात शनिवार दिनांक २५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता मेळाव्याला सुरुवात होणार आहे. माळी समाजातील उपवर मुला मुलींसह पालकांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन डॉ. नलीन महाजन, ज्ञानेश्वर भादू महाजन, महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शालिग्राम मालकर, जिल्हाध्यक्ष श्याम माळी, जिल्हा उपाध्यक्ष संतोष माळी यांनी केले आहे.



