क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वैचारिक दृष्टिकोनातून जयंती साजरी ;राजेश्री संघमित्रा फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम ;

भुसावल – राजेश्री संघमित्रा महिला सामाजिक बहुउद्देशीय फाउंडेशन भुसावळ तर्फे आयोजित क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची १९४ वी जयंती साजरी करण्यात आली . ३ जानेवारी २०२५ रोजी शहर पोलीस स्टेशन जवळ जुने प्रांन्त कार्यालय समोर आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.रजनीताई संजय सावकारे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले .

यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे , बाजारपेठ पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक राहुल वाघ , तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड , डॉ.सुवर्णा गाडेकर भुसावळ पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रेम परदेशी दै.सामना पत्रकार उज्ज्वला बागुल ॲड.प्रिया अडकमोल यांच्या सह सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे भाजपा महिला आघाडीच्या शहर अध्यक्ष अनिता आंबेडकर मा.नगरसेवक राजेंन्द्र आवटे नगरसेवक राजू नाटकर गव्ह.इंजिनिअर राजेश चंदन, आरपीआय(आ) उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष सुदाम सोनवणे , शहराध्यक्ष भाजपा अनु.जाती. मोर्चाचे राहुल तायडे , अनु.जाती. मोर्चाचे सरचिटणीस गणेश जाधव अनु.जाती. मोर्चाचे उपाध्यक्ष प्रेमचंद तायडे , उपाध्यक्ष गौरव वाघ आरपीआय डेमोक्रॅटिक जळगाव जिल्हाध्यक्ष विजय साळवे आरपीआय(आ)) शहराध्यक्ष सुनिल ढिवरे राजेश्री सोनवणे नारायण कोळी आदी.उपस्थित होते . सुरवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आई सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलन करण्यात आले उपस्थित मान्यवरांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले . यावेळी मान्यवरांना फाउंडेशन अध्यक्ष राजश्री सुरवाडे यांनी पेन भेट देऊन स्वागत केले

यावेळी राजेश्री सुरवाडे यांनी प्रस्ताविक करतांना आई सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त दि ३ जानेवारी २०२० मध्ये फाउंडेशनने अंतर्गत अवनी दत्तक योजना शैक्षणिक उपक्रम चा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे १० वे वर्ष असून मागिल ९ वर्षांपासून जयंतीनिमित्त अभिवादन स्वरूपात शैक्षणिक साहित्य संकलन करतो त्या अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त इ.५ वी ते इ.१० मध्ये शिक्षण घेत असलेल्या आता पर्यंत भुसावळ तालुक्यातील शिंदी , कंडारी , ओझरखेडा या ग्रामीण भागातील बहुजन समाजातील ज्यांचे आई-वडिल नाही किंवा ज्यांची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची अशाच विद्यार्थीनींना मान्यवरांच्या हस्ते साहित्य वितरण करण्यात आले असुन यावर्षी योजना मध्ये बदल करण्यात आला असुन या वर्षी २० मुलांनाही सदर अवनी दत्तक योजना मध्ये सहभागी करण्यात आले असुन आता बहुजन समाजातील ४० विद्यार्थी यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे यंदा जे काही शैक्षणिक साहित्य संकलन दि ३ जानेवारी २०२० मध्ये फाउंडेशन अंतर्गत अवनी दत्तक योजना शैक्षणिक उपक्रम चा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले असुन ते एप्रिल महिन्यात महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सव निमित्त वितरण करण्यात येणार असल्याचे सांगितले

सदर उपक्रमाला मदतीचा हात देण्यासाठी बहुजन समाजातील डॉक्टर वकिल पोलीस प्रशासन इंजिनिअर पत्रकार शिक्षक-शिक्षिका नगरसेवक समाजसेविका सामाजिक कार्यकर्ते रेल्वे कर्मचारी सिटीआय , बैंक मॅनेजर स्वयंपाकी विविध संस्था चालक विविध राजकीय पक्षांचे नेते कार्यकर्ते यांच्या सह शिक्षण घेत असलेले विद्यार्थी या सर्वांनी आज अभिवादन स्वरूपात शैक्षणिक साहित्य देऊन मदतीचा हात दिला विशेष म्हणजे या वर्षी उपक्रमाची दखल घेऊन भुसावळ शहरासह कंडारी , साक्री , फेकरी , साकेगाव जळगाव , रावेर ,फैजपूर यावल तालुक्यातील मारुळगाव व नाशिक येथील काही नागरिक हे फाउंडेशन च्या कार्याची दखल घेऊन अभिवादनासाठी आले व शैक्षणिक साहित्य देऊन मदतीचा हात फाउंडेशन च्या कार्याची दखल घेतली .

अभिवादन दिनी संकलन झालेले शैक्षणिक साहित्य ४० शाळेची बॅग, ४० साहित्यांनी भरलेली कंपास, ४० लेटरपॅड, १३८ वह्या (२०० पेजेस), २६३ रजिस्टर( २०० पेजेस) , ४० खडु कलर बाॅक्स ,१७२ पेन , यासह ६०००/- रूपये ची आर्थिक मदत सदर उपक्रमासाठी दात्यांनी दिले. यावेळी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फाउंडेशन अध्यक्ष राजश्री सुरवाडे सचिव निर्मला सुरवाडे, सुजाता सपकाळे,प्रतिमा अग्रवाल, माधुरी सपकाळे यांनी परिश्रम घेतले.